मुंबई/पुणे

Maharashtra Politics: 'थोडी जरी लाज शिल्लक असेल, तर... '; मंत्री तानाजी सावंतांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक

Vishal Gangurde

varsha Gaikwad News:

राज्यभरातील सरकारी रुग्णांच्या मृत्यू प्रकरणानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. रुग्णाच्या मृत्यू प्रकरणावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर मुंबई काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

'या सर्व प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत शिंदे सरकारच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा, आमदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. (Latest Marathi News)

आरोग्यमंत्री तानाजी सावंत काय म्हणाले होते?

शनिवारी साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नांदेड मृत्यू प्रकरणावर वक्तव्य केलं होतं. 'या घटनेसाठी आपण एकटे नाही, तर संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार आहे, असं वक्तव्य मंत्री सावंत यांनी केलं होतं. मंत्री सावंत यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली.

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील दुरावस्थेबाबत काँग्रेसने आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री या दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी राज्यपालांकडे केली होती. या मागणीनंतर काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'आरोग्यमंत्रीच म्हणतात की, या घटनांसाठी एकटा मीच नाही, तर संपूर्ण मंत्रिमंडळच जबाबदार आहे. थोडी जरी लाज शिल्लक असेल, तर आता तरी या संपूर्ण शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा, असे प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या.

नांदेड , छत्रपती संभाजीनगरसहित अनेक शासकीय रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू

ॲाक्टोबर महिन्यात राज्यातील विविध सरकारी रुग्णालयांमध्ये अनेक रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडली. नांदेडच्या २४ तासांत २५ जण दगावले. तर छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातही १२ रुग्ण दगावले होते.

नागपुरातही २४ तासांत १८ जण दगावल्याचं वृत्त आहे. या सर्व प्रकरणानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. या सर्व घटनेवर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत आरोग्यमंत्री व वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Petrol Diesel Rate (24th Feb 2024) : मध्यप्रदेशमध्ये पेट्रोल-डिझेलचा भाव स्थिर, महाराष्ट्रात इंधनाचा आजचा दर किती?

Hemant Patil On Reservation | मराठा आरक्षणावर हेमंत पाटील काय म्हणाले? | Marathi News

Yugendra Pawar शरद पवारांसोबतच ,पवारांसोबतचा फोटो केला ट्विट!| Marathi News

Car Accident News: भरधाव कार दुचाकीला धडकून झाडावर आदळली; भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू

कालवा समितीच्या बैठकीनिमित्त Pune मध्ये काका-पुतण्या एकत्र!| Marathi News

SCROLL FOR NEXT