Shinde Group : उद्धव ठाकरेंना शिंदे गटाचा दे धक्का! दिंडोशी विधानसभामध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार

Shinde group shiv sena : शिंदे गटाच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देत दिंडोशी मतदारसंघात मोठं खिंडार पाडलंय.
Shinde Group Shiv Sena
Shinde Group Shiv SenaSaam Tv
Published On

(आवेश तांदळे)

Shinde Group Shiv Sena:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या गटाला मोठा धक्का दिलाय. आमदार सुनील प्रभू यांच्या विधानसभा मतदारसंघांतून नगसेविकासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेविका विनया विष्णू सावंत यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिवसेनामध्ये प्रवेश केला. (Latest News)

विनया विष्णू सावंत ह्या मालाड पूर्वेत दिंडोशी विधानसभा मतदारसंघात वार्ड क्रमांक ३९ मधील माजी नगरसेविका आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पती विधानसभा संघटक विष्णू सावंत यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. याप्रमाणे चांदीवली विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली असल्फा येथील दोन माजी नगरसेवक लीना शुक्ला आणि हरीश शुक्ला यांनीही शिवसेनेत प्रवेश केलाय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. याचबरोबर चांदीवलीतील काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्षा माया खोत आणि उपाध्यक्ष जया नाडर यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी तसेच मुस्लिम महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचे शिवसेनेमध्ये स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईत शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. २०१७ मध्ये निवडून आलेले ३५ नगरसेवक आज शिवसेनेत दाखल झालेत.

ज्यांनी तुमचा प्रोजेक्ट नाकारला त्यांना जनतेने रिजेक्ट केलं. जेव्हा स्वताच्या स्वार्थ जागृत होतो, तेव्हा तसं त्यांच्यासोबत घडतं, अशी म्हणत एकना शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. गेल्या अडीच वर्षांत सर्व काम बंद होती. अहंकारामुळे सर्व काम बंद होते आम्ही सत्तेत आल्यावर सर्व सुरू केले. आम्ही जनतेच्या फायद्याचे निर्णय घेतो असेही शिंदे यावेळी म्हणाले.

Shinde Group Shiv Sena
Cm Eknath Shinde: नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे केंद्र सरकारने दिले आश्वासन: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com