Dr BR Ambedkar Death Anniversary: Saam tv
मुंबई/पुणे

Dr BR Ambedkar Death Anniversary: ६ डिसेंबरला मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; काँग्रेसची राज्य सरकारकडे मागणी

Vishal Gangurde

Dr BR Ambedkar death anniversary latest Update:

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी, ६ डिसेंबर रोजी मुंबईच्या चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय दरवर्षी येतो. या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी शिंदे सरकारकडे महत्वाची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

महापरिनिर्वाण दिनी सर्वांनाच चैत्यभूमीवर अभिवादन करणं शक्य व्हावं, यासाठी मुंबईतील सरकारी कार्यालयांसह खासगी कार्यालयांना सुटी जाहीर केली आहे,अशी मागणी गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'बाबासाहेबांनी आयुष्यभर जातीवाद दूर करण्यासाठी करणे आणि गरीब, अनुसूचित जाती-जमाती, मागावर्गींयांच्या विकासांसाठी समर्पित केलं. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीला महामानवास अभिवादन करण्यासाठी राज्यासहित देश-विदेशातून मोठ्या संख्येने भीम अनुयायी दाखल होतात. मात्र, या दिनी सर्व कार्यालये सुरू असल्याने अनेकांना महामानवास अभिवादन करणे शक्य होत नाही, असं मत वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलं.

'या दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक संघटना गेल्या अनेक वर्षांपासून सुट्टी मिळावी, अशी मागणी करत आहेत. त्यातच ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी समन्वय समितीने मुंबई शहरात स्थानिक सुट्टी जाहीर करण्याची शिफारस शासनाला केली आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

तत्पूर्वी, 'सध्या सामाजिक वातावरण फार संभ्रमात्मक दिसत आहे. राज्यात काही भागात जातीय तेढ निर्माण होत आहे. प्रत्येक ठिकाणी एकमेकांचे वाभाडे काढत असल्याचे दिसून येत आहे. या काळात बाबासाहेब आंबडेकरांचे समता व बंधुता हे विचार जनसामान्यांमध्ये रूजणे फार गरजेचं आहे. त्यासाठीच या दिवशी म्हणजेच बाबासाहेबांच्या ६७व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुट्टी जाहीर करावी, असं मागणी करणारं पत्र गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

Indian Army Job: बक्कळ पगार अन् इंडियन आर्मीत नोकरी करण्याची संधी; अशी होणार भरती; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: अतुल बेनके घड्याळावर लढणार, प्रचाराला सुरुवात; म्हणाले दादा-साहेबांना एकत्र आणणार!

SCROLL FOR NEXT