Breaking News: काँग्रेस आमदार शरद रणपिसे यांचे निधन... Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking News: काँग्रेस आमदार शरद रणपिसे यांचे निधन...

पुण्यातील जोशी हॅास्पिटलमध्ये सुरु होते उपचार

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे - महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार शरद रणपिसे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पुण्यातील जोशी हॅास्पिटलमध्ये Joshi Hospital त्यांच्यावर उपचार सुरु होते. हर्नियाच्या ऑपरेशन नंतर त्यांना हृदयविकाराचा झटका Heart Attack आला होता. त्यानंतर त्यांच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली होती. गेली चार ते पाच दिवस त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते. आज दुपारी त्यांचे निधन झाले. महाराष्ट्र काँग्रेसने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

त्यांनी विविध पद भूषवली आहेत. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहेत. आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ते काँग्रेसकडून Congress विधान परिषदेवर आमदार होते. त्याचबरोबर ते काँग्रेसचे विधान परिषदेतील माजी गटनेते होते. त्यांचा जन्म 18 सप्टेंबर 1951 रोजी पुण्यात झाला होता. त्यांच्याकडे B.Com ची पदवी आहे.

उद्या सकाळी शरद रणपिसे यांच्या राहत्या घरी सकाळी 9 ते 10.30 वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर कोरेगाव पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.

त्यांनी भुषवलेली पदे;

1979-85 पुणे महानगरपालिकेचे सदस्य

1983-84 गलिच्छवस्ती निर्मूलन, गृहनिर्माण व समाज कल्याण समितीचे अध्यक्ष

1985-86- अध्यक्ष, अनुसूचित जाती कल्याण

1985-90/ 1990-95- सदस्य, महाराष्ट्र विधानसभा

1994-95- सदस्य "उर्वृत महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ "

त्यांनी अनेक युरोपीय देशांना अभ्यास भेटी दिल्या आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चीन, हाँगकाँग आणि सिंगापूर इथे त्यांना अभ्यास भेटी दिल्या आहेत. त्यांना योगा, वाचनाची आवड होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे-सीएसएमटी लोकल बंद

Gadchiroli Weather Update : गडचिरोलीत मुसळधार पावसाने थैमान, तब्बल १०० गावांचा संपर्क तुटला

Ranveer Singh: रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटाच्या सेटवरील १०० हून अधिक क्रू मेंबर्स रुग्णालयात दाखल; नेमकं काय घडलं ?

Rain Update : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; बोरी नदीवरील पुलावरून पाणी, धाम प्रकल्प ओव्हरफ्लो

ठाणे स्टेशनच्या जिन्याला धबधब्याचं स्वरूप; पाणी वाहतानाचा VIDEO समोर, प्रवाशांची तारांबळ

SCROLL FOR NEXT