मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यानंतर आज सोमवारी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ३०० खासदारांनी आंदोलन केले. राहुल गांधी यांच्या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. राहुल गांधी यांच्या भूमिकेचे महाराष्ट्रातही पडसाद उमटू लागले आहेत. आगामी निवडणुकीत VVPAT मशीन नसतील तर बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे केली.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पडाव्यात, यासाठी या निवडणुका व्हीव्हीपॅट मशिन्ससह व्हाव्यात. तसेच या आगामी निवडणुकीत VVPAT मशीन नसतील तर बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी केल्याने निवडणूक आयोग काय भूमिका घेते,हे पाहावे लागेल.
आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या व्हीव्हीपॅटवर घेता येणार नाही अशी भूमिका घेतली आहे. परंतु यापूर्वी मतांची चोरी झाल्याचे प्रचंड गंभीर स्वरूपाचं आरोप विविध राज्यांतील राजकीय पक्षांकडून वारंवार निवडणूक आयोगावर झाले आहेत. त्यामुळे पुन्हा व्हीव्हीपॅटचा वापर करणार नाही अशी निवडणूक आयोगाने भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी केलेल्या आरोपांची पुष्टी होते. एका प्रमाणात चार मतदान असल्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर होत असल्यास वेळ जाणार असे निवडणूक आयोगाचे मत आहे'.
'निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात आणि लोकांचा संभ्रम दूर करावा अशी आमची भूमिका आहे.त्यामुळे विनंती करण्यात येते की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका या सर्व निवडणुका व्हीव्हीपॅटसह किंवा बॅलेट पेपरवर घ्याव्यात, जेणेकरून लोकांना आपल्या पारदर्शकतेवर विश्वास बसेल आणि निवडणुका सुरळीत पार पडता येतील अशी आमच्याकडून आपणावर अंमलबजावणी कराल अशी अपेक्षा आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.