Varsha Gaikwad Saam Tv
मुंबई/पुणे

Varsha Gaikwad: हवा प्रदूषणावरून वर्षा गायकवाडांचे मुख्यमंत्र्यांना प्रश्न; प्रदूषण रोखण्यासाठी सुचवला उपाय

Varsha Gaikwad: मुंबई काँग्रेसचे अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी वायू प्रदूषणावरून मुख्यमंत्री शिंदेंना प्रश्न केलेत. त्याचबरोबर त्यांनी प्रदूषण रोखण्याचा उपाय सुचवलाय.

Bharat Jadhav

Varsha Gaikwad On Air Pollution:

मुंबईतील वाढलेल्या वायू प्रदुषणावरून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केलीय. चुकांची दुरुस्ती न करता आपण जे करत आहोत, त्याची स्वतःहून प्रशंसा करणं ही मुख्यमंत्र्याची खासियत असल्याची टीका गायकवाड यांनी केलीय. (Latest News)

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि दिल्लीमध्ये वायू प्रदूषण वाढलंय. हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांना श्वास घेणंही कठीण झालं आहे. वायू प्रदूषणावरून विरोधकांनी सरकाराला धारेवर धरलंय. मुंबई काँग्रेसचे अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी वायू प्रदूषणावरून मुख्यमंत्री शिंदेंना प्रश्न केलेत. त्याचबरोबर त्यांनी प्रदूषण रोखण्याचा उपाय सुचवलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रदूषण कमी करण्याच्या उपायवर काम करताना मुख्यमंत्री चुकीचा उपाय राबवत असल्याची टीका वर्षा गायकवाड यांनी केलीय. हवा प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या कामाचं मुख्यमंत्री शिंदेंनी कौतुक केलं. त्यावरून वर्षा गायकवाड यांनी त्यांना कोपरखळी मारली. हवा प्रदूषणाची पाहणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी त्यांनी त्याविषयी काही प्रश्न केले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी नाले सफाईची पाहणी केली. तेव्हा पहिल्याच पावसात मुंबईत तुंबली. महानगरपालिकेच्या नालेसफाई हा एक मोठा भ्रष्टाचार होता. हेच हवा प्रदूषणावरून होत आहे. कारण आयुक्त हे प्रशासक म्हणून काम करतात. ते प्रत्येक काम करताना मुख्यमंत्र्यांना विचारून करत असतात. आज प्रदूषणामुळे मुंबईतील प्रत्येक घरात एक तरी व्यक्ती आजारी आहे. मुंबईतील एअर इंडेक्स पाहिला तर वाढलेला दिसतोय

दिवाळी होती त्यावेळेला सुद्धा तो इंडेक्स वाढला होता. हे सांगण्याचा तात्पर्य असा की, चुकांची दुरुस्ती न करता आपण जे करत आहोत त्याची स्वतःहून प्रशंसा करणं ही मुख्यमंत्र्याची खासियत आहे. मुख्यमंत्र्यांची ही खासियत नालेसफाईच्या आणि आता प्रदूषणावेळी आपण पाहिल्याची कोपरखळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना मारलीय. सुशोभीकरणाच्या नावावर फक्त लाईट लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी १७ हजार कोटी रुपये खर्च केले.

मुख्यमंत्र्यांना सांगितला उपाय

मुख्यमंत्र्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करावा. लोकांना विचारावं आणि नंतर त्यावर काम करावं. मुंबईत इको टुरिझम होत नाहीये. झाडे लावण्याचा कामे होत नाहीये. ओपन स्पेस ( मोकळ्या जागा ) बद्दल कोणतीही प्लॅनिंग करण्यात आलेली नाही. या मोकळ्या जागा मुंबई पालिकेने आपल्या ताब्यात घ्याव्यात आणि त्यात उद्याने तयार करावीत.

जेणेकरून नागरिकांना चांगला श्वास घेता येईल. परंतु दुर्देवाने अशी कुठलीय गोष्ट केली जात नसल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्यात. क्लाइमेट कमिटीने ज्या सुचना केल्या आहेत, त्यावर काम करावं. तसेच पर्यावरण मंत्रीची नेमणूक करावी. परंतु आता जे काम चालू तेच चालू राहीलं तर येणाऱ्या काळात मुंबईतील प्रदूषण वाढेल असंही त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Swiggy CEO networth : स्विगीचे सीईओंचं शिक्षण आणि नेटवर्थ किती?

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT