PM Modi Saam Tv
मुंबई/पुणे

PM Modi: मोदींनी सत्तेसाठी पुलवामा घटना घडवून आणली, काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त ट्विट

काँग्रेस नेते उदित राज यांनी पंजाब येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत एक वादग्रस्त ट्विट केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : काँग्रेस नेते उदित राज यांनी पंजाब येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत एक वादग्रस्त ट्विट केले आहे. सत्तेच्या भूकेपोटी पंतप्रधान मोदींनी पुलवामा घटना घडवून आणल्याचे वादग्रस्त ट्विट उदित राज यांनी केले आहे. यावर भाजपनेही उदित राज यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे (Congress Leader Udit Raj Controversial Tweet About PM Modi).

उदित राज यांनी काय ट्विट केलं?

काँग्रेस (Congress) नेते उदित राज यांनी ट्विट केले आहे की, पीएम मोदींच्या सुरक्षेच्या नावाखाली ढोंगी आणि पुजाऱ्यांचे दुकान सुरु झाले आहे.

पुलवामा घटना पीएम मोदींनी घडवून आणली - उदित राज

उदित राज यांनी पुढच्या ट्विटमध्ये लिहिले की, 'पंतप्रधान मोदींच्या नौटंकीमुळे आता पुष्टी झाली आहे की, सत्तेच्या भुकेसाठी पुलवामा घटना त्यांनी स्वतःच घडवून आणली होती.'

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींवर उदित राज काय म्हणाले?

उदित राज यांनी झी मीडियाला सांगितले की, फिरोजपूरमध्ये जे काही घडले त्याला नौटंकी म्हटले जाईल. कारण पीएम मोदींवर कोणीही गोळीबार किंवा दगडफेक केली नाही, मग मी वाचलो असे ते का म्हणाले. विनाकारण या प्रकरणाला मोठं केलं जात आहे.

भाजपने प्रत्युत्तर दिले

काँग्रेस नेते उदित राज यांच्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर देत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, काँग्रेस नेते सोनिया गांधींच्या सांगण्यावरुन अशी विधाने करत आहेत. मी असेही म्हणू शकतो की राहुल गांधी चीनमधून पैसे घेतात. सोनिया गांधींना पाकिस्तानातून लोकशाही कमकुवत करण्याच्या सूचना मिळतात. पण पुराव्याशिवाय आम्ही कोणावरही निराधार आरोप करत नाही. उदित राज भाजपमध्ये असताना काँग्रेसवर आरोप करायचे, आता काँग्रेसमध्ये गेले तर भाजपवर आरोप करत आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi : शुभमन गिलमुळे शतक ठोकलं, आता त्याच्यासारखं द्विशतकही करणार, वैभव सूर्यवंशीनं पूर्ण प्लान सांगितला

Shravana Nakshatra : मकर राशीच्या व्यक्तींचे आयुष्य आणि श्रवण नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचे करियर जाणून घ्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप, ठाकरेंचे खासदार आणि आमदार महायुतीच्या संपर्कात? भाजपच्या संकटमोचकाचा दावा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त नांदेड शहरातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

SCROLL FOR NEXT