Nana Patole  Saam Tv
मुंबई/पुणे

Nana Patole On Modi Government: '9 वर्षांत भाजपने देशाला लुटलं', नाना पटोलेंचा मोदी सरकारवर निशाणा

Modi Government 9 Years: 'भाजपचा खरा चेहरा आता समोर आला आहे.' अशी टीका देखील नाना पटोले यांनी केली आहे.

Priya More

Mumbai News: देशातील मोदी सरकारला (Modi Government) नुकताच 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 'भाजपचा खरा चेहरा आता समोर आला आहे. मोदी सरकारने गेल्या 9 वर्षांत देशाला लुटलं', अशी टीका त्यांनी केली आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली आहे.

नाना पटोले यांनी सांगितले की, 'मोदी सरकारने जीएसटीसारखा (GST) सुलतानी कायदा आणला. प्रत्येक गोष्टींवर जीएसटी आहे. सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत सर्वसामान्यांवर टॅक्सचा बोझा आहे. आम्हीच देशाचा विकास केला असा आव देशाचे पंतप्रधान आणत आहेत.' तसंच, 'त्यांनी देशातील खरी परिस्थिती आणि वस्तूस्थिती मांडली पाहिजे. त्यांनीच २ हजारांच्या नोटा आणायच्या आणि त्यांनीच बंद करायचे. त्यावेळी त्यांना समजले नव्हते का आताच त्यांना समजले का?', असा सवाल नाना पटोले यांनी केला.

'महागाई आणि बेरोजगारीमुळे जनतेचे जीवन उद्धवस्त झाले आहे. या 9 वर्षातील परिस्थिती भाजपने माडंली असती तर खऱ्या अर्थाने पंतप्रधानांना विश्वगुरु पदवी देता आली असती.', अशी टीका नाना पटोले यांनी केली. तसंच, 'महविकास आघाडीतील आलबेल नाही. तर शिंदे गटात आणि भाजप यांच्यातही अलबेलासारखी परिस्थिती आहे. आम्हाला देश वाचवायचा आहे. संविधान वाचवणे हे आमचं ध्येय आहे. आधी देश आणि नंतर सत्ता. आम्ही संघटितच निवडणुकीला पुढे जाऊ.'

सकाळने केलेल्या सर्वेक्षणावर बोलताना नाना पटोले यांनी सांगितले की, 'सकाळच्या सर्वेक्षणात देखील राज्यात महाविकास आघाडीला 43 टक्के लोकांचा कौल मिळाला आहे. काँग्रेस हा त्यामधील मोठा भाऊ आहे. त्यामुळे आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत नाही तर आम्ही समन्वयक आहोत. आम्ही मोठे आहोत असा कधी आव आणला नाही. मोठेपणाचा गर्व करण्याचे कारण नाही. सध्या देश महत्वाचा आहे देशाचे संविधान महत्वाचे आहे. भाऊ असलो तरी मोठेपणा करण्याची आम्हाला गरज नाही.' असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेवटची तारीख उलटून गेली, अजूनही HSRP नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार? वाचा

'धुरंधर'चा खेळ संपला; बॉक्स ऑफिसवर The Raja Saabचं तुफान, प्रभासच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Pune : 'त्या' क्लबच्या मद्यपरवाना निलंबनावर स्थगिती, उच्च न्यायालयाने काय घेतला निर्णय?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी, डिसेंबर-जानेवारीचे ₹३००० खात्यात एकत्र येणार

Rose Sharbat : घरच्या घरी बनवा फ्रेश गुलाब सरबत, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT