Nana Patole  SAAM TV
मुंबई/पुणे

Nana Patole: प्रकाश आंबेडकरांनी मविआ नेत्यांपुढे कोणता प्रस्ताव मांडला? नाना पटोलेंनी सर्वकाही सांगितलं

Nana Patole on Prakash Ambedkar: महाविकास आघाडीच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी हजेरी लावली. या बैठकीत प्रकाश आंबेडकरांनी मविआ नेत्यांपुढे काही प्रस्ताव मांडले, त्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी माहिती दिली आहे.

Vishal Gangurde

रुपाली बडवे, मुंबई

Nana Patole News:

राज्यातील सत्ताधाऱ्यांसहित विरोधकांनाही आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा धडाका लावला आहे. आजही महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी हजेरी लावली. या बैठकीत प्रकाश आंबेडकरांनी मविआ नेत्यांपुढे काही प्रस्ताव मांडले, त्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. नाना पटोले म्हणाले, 'महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांची भूमिका सकारात्मक होती. कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवणार आहे. आमच्याकडून पृथ्वीराज चव्हाण त्यात असतील. ८ दिवसांत कॉमन मिनीमम प्रोग्राम बनवला जाईल'.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाना पटोले प्रकाश आंबेडकरांवर काय म्हणाले?

'आम्ही सर्व ⁠भाजप विरोधात लढायला एकत्र आलो आहोत. ⁠प्रकाश आंबेडकर असं काही म्हटलं नाही. मी त्यांच्या बाजूला होतो. ⁠ओबीसी, मराठा आरक्षण या संदर्भातही प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव आहे. यानंतर जागा वाटपासंदर्भात निर्णय घेतला जाईल. ⁠जागा वाटपाच्या संदर्भात कोणताही वाद नाही. ४८ जागा या महाविकास आघाडी एकत्रित लढेल, असेही त्यांनी सांगितले.

बाबा सिद्दीकी यांच्यावर नाना पटोले काय म्हणाले?

'झिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी आताही बाळासाहेब थोरात यांच्यासोबत बसले आहेच. राजीनामा देणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. ⁠तुम्ही बातम्या दाखवत आहात. पण ⁠कोणताही आमदार राजीनामा देणार नाही, असेही नाना पटोलेंनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT