Devendra Fadnavis - Nana Patole News  Saam TV
मुंबई/पुणे

Nana Patole: ही भाजपची खेळी; देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यावर नाना पटोलेंना 'हा' संशय

Devendra Fadnavis - Nana Patole News : पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्याशी चर्चा करून झाला होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Devendra Fadnavis - Nana Patole : पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्याशी चर्चा करून झाला होता, या देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यात काँग्रेसला पडायचे नाही. या घटनेला साडेतीन वर्षे झाल्यानंतर फडणवीस यांना आताच त्याचा साक्षात्कार का झाला? आधी का बोलले नाहीत? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला.

काँग्रेससाठी पहाटेचा शपथविधी महत्वाचा नाही, तर महागाई, बेरोजगारी, शेतकरी आणि जनतेचे मुलभूत प्रश्न महत्वाचे आहेत आणि त्यासाठी आम्ही आवाज उठवत आहोत, असेही नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

नाना पटोले म्हणाले की, 'महाराष्ट्रात शेतकऱ्याची आज काय अवस्था झाली आहे? कापूस, कांदा, सोयाबीनचे दर घसरले आहेत आणि केंद्र सरकार कापसाच्या गाठी आयात करत आहे. महागाई वाढली, बेरोजगारी वाढली आहे. शेतकरी दररोज आत्महत्या करत आहे, गरिबांच्या पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था नाही, आमदार सुरक्षित नाहीत, जनता सुरक्षित नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी फुसकी सोडून लोकांना मुळ मुद्द्यापासून दुसरीकडे वळवायचे ही भाजपची खेळी आहे; पण जनतेला भाजपची ही खेळी समजल्याने आता हे चालणार नाही.'

२०१९ साली सरकार स्थापनेवेळी काय झाले यावर आज चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. या घटनेला खूप कालावधी लोटला आहे, त्यावर चर्चा करण्याची ही काही वेळ नाही. असेच असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ साली काय झाले होते तेही सांगावे, त्यावेळी शिवसेनेचे एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते झाले होते, सत्तेसाठी भाजप काहीही करते, असा हल्लाबोलही पटोलेंनी केला.

आताही राज्यात असंवैधानिक सरकार आहे, या शिंदे-फडणवीस सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, जनतेचा विश्वासघात केला आहे. महागाईने जगणे कठीण झाले आहे. तरुणांना बेरोजगारीच्या दरीत ढकलले आहे. या प्रश्नांवर सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे; पण त्याकडे हे सरकार लक्ष देत नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संगमनेरचा भोंदू राजेंद्र गडगेला कोर्टात करणार हजर

मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण अपघात, ज्येष्ठ नागरिकासह तिघांचा मृत्यू

विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग; राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला संधी मिळणार? ४ जणांची नावे चर्चेत

Pune : पुण्यात चाललंय काय? महिला पोलीस अधिकाऱ्याचा सासरच्या मंडळीकडून छळ अन् मारहाण, ६ जणांविरुद्ध गुन्हा

Aloe Vera And Coconut Oil Hair Mask: कोरफडमध्ये 'हे' तेल मिक्स करून लावा, केस होतील सिल्की आणि शायनी

SCROLL FOR NEXT