nana patole and eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

Nana Patole : एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सर्टिफिकेट देण्यापेक्षा....; नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना खणखणीत टोला

Nana Patole News : नाना पटोलेंनी मुख्यंमंत्र्यांना खणखणीत टोला लगावला आहे. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सर्टिफिकेट देण्यापेक्षा जनताच त्यांचं अवलोकन करेल, अशी टीका पटोलेंनी केली.

Vishal Gangurde

शुभम देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

भंडारा : विधानसभा निवडणूक रंगात आली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरेंवर टीका केली जात आहे. आता शिंदेंच्या टीकेला नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सर्टिफिकेट देण्यापेक्षा जनताच अवलोकन करेल, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले म्हणाले, 'कोण कोणासोबत स्वार्थासाठी सत्तेत गेले. कोण भ्रष्टाचारासाठी सत्तेत गेले. हे महाराष्ट्रातील जनता त्याचं अवलोकन करेल. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सर्टिफिकेट देण्यापेक्षा जनता आता खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्याच बाजून निर्णय देऊन महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीला सर्टिफिकेट देईल असे चित्र आहे'.

'महाराष्ट्रातील भाजप महायुतीचं सरकार होतं, त्यांनी शेतकऱ्यांवर दुर्लक्ष केलं, या राज्यातील उद्योगांना पाहिजे ती चालना मिळाली नाही. गुजरातला सगळे उद्योग पाठवले. त्यामुळे महाराष्ट्राच्या जीडीपी खाली पडणार हे सहाजिकच आहे. एकनाथ शिंदे, फडणवीस, पवार आपली पाठ आपल्या हाताने थोपटताय. आपण बघत आहोत. महापुरुषांना बदनाम करण्याचा कलंक तर यांनी लावलाच, पण महाराष्ट्राला मागास करण्यामध्येही या महायुती सरकारचा सगळ्यात मोठा वाटा राहिलेला आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

'आम्ही कालपर्यंत जी भूमिका मांडत होतो. आपण आरोप म्हणत होतो. ते आरोप नाही तर सत्य असल्याचे समोर आले. त्यामुळे या महाभ्रष्ट महाअत्याचारी शेतकरी, तरुणांच्या, महिलांच्या आणि गरिबांच्या विरोधी असणाऱ्या सरकारला सत्तेतून काढलं तरच महाराष्ट्राचा उद्धार होईल. त्यासाठी महाविकास आघाडीच पर्याय आहे. जनतेच्या आशीर्वादाने सत्तेतही येईल. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या जीडीपीच्या तुलनेत महाराष्ट्राच्या जीडीपी दोन टक्क्यांनी घटला, असे नाना पटोले म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whats App युझर्ससाठी आनंदाची बातमी, प्रेमी जोडप्यांसाठी चॅटिंग झालं सोपं

Maharashtra News Live Updates: उल्हासनगरात गोदामाला भीषण आग, आकाशात धुरांचे लोट

Nandurbar Accident : नंदूरबारमध्ये भरधाव वाहनाने ३ दुचाकींना चिरडले; अपघातात ५ जणांचा मृत्यू, ऐन दिवाळीत कुटुंबांवर शोककळा

Maharashtra Politics : पाडवे दोन, भाऊबीज एक? बारामतीत पवार कुटुंबीयांचे पहिल्यांदाच दिसले २ पाडवे, पाहा व्हिडिओ

Sada Sarvankar : 'मी पक्षासाठी उमेदवारी मागे घेण्यास तयार, पण...'; सदा सरवणकर यांनी मनसेपुढे ठेवली एक अट

SCROLL FOR NEXT