Congress aggressive against Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

BJP Vs Congress: फडणवीसांविरोधात कॉंग्रेस आक्रमक; सागर बंगल्याबाहेर पोलीसांचा चोख बंदोबस्त

BJP Vs Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी महाराष्ट्र कॉंग्रेसवर कोरोना पसरवल्याचा गंभीर आरोप केला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्याविरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर (Sagar Bunglow) आंदोलन करण्यासाठी कॉंग्रेस (Congress) कार्यकर्ते निघाले आहे. त्यामुळे पोलीसांनी फडणवीसाच्या सागर बंगल्यासमोर चोख बंदोबस्त केला आहे. सोबतच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nan Patole) यांच्या घराबाहेरही पोलीसांच्या मोठा फौजफाटा आहे. संपुर्ण परिसराला छावणीचं स्वरुप आलं आहे. (Congress aggressive against Fadnavis; Strict police security outside Sagar Bungalow)

हे देखील पहा -

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी महाराष्ट्र कॉंग्रेसवर कोरोना पसरवल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर विविध ठिकाणी आंदोलन झाले. त्यानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा केला होता. त्यांनतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी पटोलेंचा एकेरी उल्लेख केला होता तसेच भाजपही कॉंग्रेसविरोधात कार्यकर्ते आक्रमक झाले होते. हिंंमत असेल तर येऊनच दाखवा जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा भाजपने दिला होता. त्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. यासाठी पोलीसांनी चोख बंदोबस्त केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भरदिवसा युवकाची हत्या, शेगाव हादरले

Malaika Arora: फिटनेस क्विन मलाइका अरोराचं वय नक्की किती?

Puran Poli Ice Cream Recipe : सणासुदीला आवर्जून घरी ट्राय करा पुरणपोळी आईस्क्रीम, फॉलो करा सिंपल रेसिपी

Health Tips: जमिनीवर बसून जेवल्याने काय होते? फायदे की तोटे

Kajal Smudge Tips: काजळ लावल्यावर लगेच पसरतं? मग या ५ टिप्स वापराच, डोळे दिसतील सुंदर अन् टपोरे

SCROLL FOR NEXT