Pune: सीटीईटीच्या परीक्षावेळी गोंधळ; आधी बाचाबाची, नंतर हाणामारीचा प्रकार Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: सीटीईटीच्या परीक्षावेळी गोंधळ; आधी बाचाबाची, नंतर हाणामारीचा प्रकार

पुण्यतील हडपसर रामटेकडी येथे एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थी आणि आयोजकात हाणामारीचा प्रकार घडला

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे: पुण्यतील हडपसर रामटेकडी येथे एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थी (Students) आणि आयोजकात हाणामारीचा प्रकार घडला आहे. परीक्षा केंद्रावर (examination center) उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांत आणि आयोजकात बाचाबाची झाल्यानंतर थेट हाणामारी झाली आहे.कोरोनाच्या (Corona) काळात तब्बल दोन हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात जमून परीक्षा घेत कोरोनाचे नियम (Rules) मोडणाऱ्या परीक्षा सेंटरवर कारवाईची विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.

हे देखील पहा-

केंद्रीय विद्यालयांतील शिक्षकांसाठी घेण्यात येणारी ही परीक्षा होती. 10 वाजता पेपर सुरु होणार होता. रिपोर्टिंगची वेळ 9.15 होती, त्यांनंतर एक मिनिटं उशिरा आलेल्या परीक्षार्थींना आत सोडले जात नाही, काही परीक्षार्थींना कोंडून ठेवल्याचा आरोप परीक्षार्थी यावेळी करत आहेत. काही परीक्षा केंद्र कर्मचारी वर्गाकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी यावेळी केला आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी उपस्थित होते.

मात्र, जमावबंदी असताना आणि ५० टक्के उपस्थिती अपेक्षित असताना. अशा वेळी दीड हजार विद्यार्थ्यांना एकत्र का बोलवण्यात आले. यासंदर्भात स्थानिक नागरिक सतीश कांबळे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कोरोनाच्या काळात तब्बल दीड हराजांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात जमून परीक्षा घेत कोरोनाचे नियम मोडणाऱ्या परीक्षा सेंटरवरच कारवाईची करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

SCROLL FOR NEXT