पब,डिस्को,बार यांना सवलतींचा प्रसाद; गणपती उत्सव बंदिवासात - आशिष शेलार
पब,डिस्को,बार यांना सवलतींचा प्रसाद; गणपती उत्सव बंदिवासात - आशिष शेलार  SaamTv
मुंबई/पुणे

पब, डिस्को, बार यांना सवलतींचा प्रसाद; गणपती उत्सव बंदिवासात - आशिष शेलार

वैदेही काणेकर, सामटीव्ही मुंबई

मुंबई : पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात अशी स्थीती राज्यात निर्माण झाली आहे, अशी टीका भाजपा नेते विधानसभा मुख्य प्रतोद आमदार अँड आशिष शेलार यांनी आज येथे केली. concessions to Pubs Discos Bars Ganpati Utsav in captivity - Ashish Shelar

गणेशोत्सवाबाबत राज्य शासनाने नियमावली जाहीर केली ती जाचक असल्याकडे लक्ष वेधीत आमदार ऍड.आशिष शेलार यांनी या नियमावलीचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, गणेशोत्सवावर याहीवर्षी ठाकरे सरकारने जे निर्बंध लादले आहेत ते एकतर्फी आहेत. गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल गणेशोत्सव महासंघ, मुर्तीकार संघटना वारंवार सरकारशी संपर्क करण्यासाठी प्रयत्न करीत असताना सरकारने कोणालाही विश्वासात न घेता गणेशोत्सवाची नियमावली आज जाहीर केली.

हे देखील पहा -

कारखान्यांमध्ये मुर्ती तयार करण्याचे काम चार महिने अगोदरच सुरु होते तेव्हा पासून मुर्तीकार संघटना सरकारला विचारणा करीत होते.पण त्याकडे दुर्लक्ष केले, कुणाशीही चर्चा न करता सर्वसमावेशक भूमिका न घेता सरकारने आता नियमावली जाहीर केली आहे. घरगुती गणेशाची मुर्ती 2 फुटाची असा निर्बंध का घालण्यात आला? मग कारखान्यात तयार झालेल्या मुर्तींचे आता काय करणार? या सगळ्यावर रोजगार म्हणून विसंबून असलेल्या कारागीर, कारखानदार यांना शासन काय मदत देणार आहे का? गतवर्षी पासून हा उद्योग अडचणीत आहे.

त्यांना मदत तर दिली नाहीच पण आता ऐनवेळेस निर्बंध घालून त्यांची कोंडी ठाकरे सरकारने केली आहे. असा एकतर्फी निर्णय लोकशाहीत मान्य नाही. त्यामुळे सरकारने फेरविचार करावा.जर बंदने घालण्यात येणार असतील तर मुर्तीकरांना मदतीचे पँकेज जाहीर करावे तेही शासनाचे कर्तव्य आहे.

कोरोनाचे नियम पाळणे सर्वांनाच मान्य आहे. त्यासाठी सँनिटायझरचा वापर, गर्दी टाळणे, कोरोनाचा फैलाव रोखणे या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. त्या कोणी नाकारत नाहीत. पण घातलेले निर्बंध असे आहेत त्यातून उत्सवाची परंपरा कशी राखली जाणार? गणेशोत्सवाची शंभर वर्षांपासूनची परंपरा खंडित होता कामा नये यासाठी सरकार काळजी घेताना दिसत नाही असेही ते म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यात बर्निंग बसचा थरार; आगीमुळे मोठी वाहतूक कोंडी

Eknath Shinde News |मुख्यमंत्र्यांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद!

Maharashtra Politics 2024 : भाजपसोबत जाण्याचा कधी आणि का घेतला निर्णय?; प्रफुल पटेलांचा पुन्हा गौप्यस्फोट

Eating Roti At Night: रात्रीच्या वेळी चपाती खाण्याचे तोटे काय

Iran News: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, शोध आणि बचाव कार्य सुरू

SCROLL FOR NEXT