Chandrakant Khaire  Saam TV
मुंबई/पुणे

Chandrakant Khaire : चंद्रकांत खैरेंना अटक होणार? शिंदे गटातील महिला आघाडीकडून पुण्यात तक्रार

चंद्रकांत खैरेंविरोधात शिंदे गटातील महिला आघाडीकडून पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Chandrakant Khaire News : औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, चंद्रकांत खैरेंविरोधात शिंदे गटातील महिला आघाडीकडून पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वक्तव्य केल्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Chandrakant Khaire News Today)

शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर शिंदे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात आक्रमक झाले होते. रविवारी औरंगाबादेत शिंदे गटातर्फे खैरे यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला.

दरम्यान, औरंगाबाद, सातारा, पाठोपाठ आता पुण्यातही शिंदे गटातील महिला आघाडीकडून खैरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यात उत्तम नगर पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या या वक्तव्यांमुळे भावना दुखावल्याचा उल्लेख सुद्धा या तक्रारीत करण्यात आला आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत खैरे?

'एकनाथ शिंदेंचा मला भयंकर राग आला आहे. या रिक्षावाल्याने इकते पैसे कुठून कमावले? शिंदेंनी शिवसेना फोडण्याचे काम केले. आनंद दिघे असते तर गद्दारी केल्यामुळे त्यांना उलटा टांगला असता. आनंद दिघेंच्या नावावर हे सगळं करतोय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा भविष्यात विजय होणार आहे. ज्यांनी गद्दारी केली ते संपले', असं चंद्रकांत खैरे म्हणाले होते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Elections : बेस्ट निवडणुक कोण जिंकणार? ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी

Tuesday Horoscope : काहींना शत्रू त्रास देतील, तर काहींची होईल प्रगती; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Maharashtra Rain Live News: लातूरच्या अहमदपूरमधून जाणाऱ्या मन्याड नदीला पूर

Pune Accident: गणपतीच्या बुकिंगसाठी गेले असता भयंकर घडलं, ट्रकने ११ वर्षांच्या मुलीला चिरडलं; अपघाताचा थरारक VIDEO

Pune : पुण्यातील शाळेत अश्लील डान्स, अंगविक्षेप करत तरुणीनं लगावले ठुमके, Video Viral

SCROLL FOR NEXT