Ambarnath Fire Saam TV
मुंबई/पुणे

Company fire in Ambernath MIDC : अंबरनाथ MIDCमध्ये कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Ambarnath Fire News : आग इतकी प्रचंड आहे की धुराचे लोट दूरवरुनही दिसत आहे.

अजय दुधाणे

Ambarnath News : अंबरनाथमध्ये एका कंपनील भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसी परिसरात रासायनिक कंपनीला भीषण आग लागली आहे. आग इतकी प्रचंड आहे की धुराचे लोट दूरवरुनही दिसत आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. घटनास्थळी अंबरनाथ, बदलापूर भागातील अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीची तीव्रता पाहता आणखी गाड्या बोलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. (Maharashtra News)

एमआयडीसी भागातील दशमेश कंपनीला ही आग लागली आहे. फोम आणि जीन्सचा कपडा बनवणाऱ्या कंपनीला ही आग लागली आहे.. आग नेमकी कशामुळे लागली याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. कंपनी कुणी कामगार अडकले आहेत का याचा शोध घेतल जात आहे. सध्यातरी आग नियंत्रणात आणण्याचं काम अग्निशमन दलाचे  (fire brigade) जवान करत आहेत.

पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत. घटनास्थळी छोटे-छोट स्फोटाचे आवाजही येत आहेत. आजूबाजूला इतर कंपन्या असल्याने आग पसरण्याचाही धोका जास्त आहे. घटनेची माहिती मिळतात नागरिकांनी परिसरात मोठी गर्दी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : एकनाथ शिंदेंच्या नेत्यांना आवरा - जैन मुनी

October Heatwave : 'ऑक्टोबर हीट' सुरु, 'या' दिवसांत कशी काळजी घ्याल? वाचा सविस्तर

BMC Election : भाजप-ठाकरेंना धक्का, BMC निवडणुकीत नव्या पार्टीची एन्ट्री, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Amitabh Bachchan Home Address: कोट्यवधी संपत्तीचे मालक अमिताभ बच्चन मुंबईत कुठे राहतात ? माहितीये का?

आनंदाची बातमी! वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांच्या सेवेसाठी तयार, कधीपासून धावणार?

SCROLL FOR NEXT