Bhima Koregaon violence 2018 case
Bhima Koregaon violence 2018 case Saam Tv
मुंबई/पुणे

Bhima Koregaon Case : मुख्यमंत्र्यांसह पाच पक्षांच्या प्रमुखांना आयोगाचं समन्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: पुणे जिल्ह्यातील भिमा-कोरेगाव येथे २०१८ साली हिंसाचार (2018 Bhima Koregaon violence) उसळला होता. या घटनेते पडसाद राज्यभर उमटले होते. याप्रकरणाची अजूनही चौकशी सुरू आहे. भिमा-कोरेगाव हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या आयोगाने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य चार पक्षप्रमुखांना समन्स (Summons) पाठवले आहे. भिमा-कोरेगाव प्रकरणात आपलं म्हणणं मांडण्यासाठी चौकशी आयोगाने हे समन्स बजावले आहे. यात मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही आयोगाने समन्स पाठवले आहे. या प्रकरणी आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे, त्याबद्दल ३० जून पर्यंत याबाबत म्हणणे सादर करावे लागणार आहे. (Commission summons leaders of five political parties in the state including Uddhav Thackeray in Bhima Koregaon violence 2018 case)

हे देखील पाहा -

राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांचे भीमा कोरेगाव प्रकरणात म्हणणे जाणून घेण्यासाठी हे समन्स बजावण्यात आलेलं आहे. यामध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण संघटनेचे अध्यक्ष राज ठाकरे, कांग्रेसचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे रामदास आठवले यांना आयोगाने समन्स बाजावलं आहे. दरम्यान या प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा जबाब याआधीच नोंदवण्यात आला आहे. भीमा कोरेगावमध्ये १ जानेवारी २०१८ ला हिंसा उसळली होती. त्या घटनेचे पडसाद नंतर महाराष्ट्राच्या राजकारणावरही पडले होते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News: सोलापुरात निकालाआधीच काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

Vastu Tips On Mobile: मोबाईलवर ठेवा हे वॉलपेपर, नशीब बदलेल

Harshaali Malhotra : बजरंगी भाईजानच्या 'मुन्नी'ला आता पाहिलं का?, ओळखणं ही झालंय कठीण

Ramdev Baba : रामदेव बाबा यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; न्यायालयाने पुन्हा याचिका फेटाळली, IMA च्या अध्यक्षांनाही बजावली नोटीस

Rupali Chakankar News : रुपाली चाकणकरांना ईव्हीएमची पुजा भोवणार?

SCROLL FOR NEXT