Ajit Pawar Visited Govansh Exhibition in pune : Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : जरा बारामतीत या, काम कसं चालतंय एकदा बघा; अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं

Ajit Pawar Visited Govansh Exhibition in pune : गोवंश राजकारणाचा विषय ठरु नये अशी अपेक्षा व्यक्त करत काही जणं त्याला वेगळं वळण देत असतात, राजकारण करायचा प्रयत्न करतात असं अजित पवार म्हणाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: पुण्यातील कृषी महाविद्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते देशी गोवंश पशू प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन २७ मे ते २९ मे दरम्यान सुरू असणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यावर प्रदर्शनातील काही त्रुटी पाहून अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना आपल्या खास शैलीत झापलं आहे. यावेळी त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले असता त्यांना त्याची व्यवस्थित उत्तर देता ना आल्याने अजित पवार यांनी त्या अधिकाऱ्यांनाही "जरा बारामतीत (Baramati) या आणि काम कसं चालतंय ते बघा एकदा" असं म्हणत खडेबोल सुनावले आहे. (Ajit Pawar Visit In Govansh Exhibition in pune)

हे देखील पाहा -

अधिकाऱ्यांना हिसका

उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी अधिकाऱ्यांना म्हणाले की, मी वेळेला महत्व देतो. मला ७:३० सांगितलं मी ७:२५ ला आलो. सांगितलं असतं तर आणखी लवकर आलो असतो. नीट पाहता आलं असतं. नुसतं वर-वर पहायला मला आवडत नाही. जे जसं आहे त्याबद्दल स्पष्ट बोललं पाहीजे. बंगळूरवरुन मी आणि राजेंद्र पवारांनी गायी आणल्या होत्या. एका ट्रक मध्ये ८ गायी. संध्याकाळी थांबायचं धारा काढायच्या असं करत आणल्या. गायींच्या प्रोडक्टना अनन्यसाधारण महत्व आलं आहे. आरोग्यासाठी चांगलं हे लोकांना कळलं आहे असं अजित पवार म्हणाले.

गोवंशावर राजकारण नको

पुढे ते म्हणाले की, “मी दुधाचा व्यवसाय केला आहे. गायींची खरेदी- विक्री करायला आम्ही जायचो. गाडीत गाय घेऊन जायचो. वेळ झाला की विहीर बघून गायीला पाणी पाजणं, चारा घालणं हे काम आम्ही केलं आहे. त्यामुळे यातले बारकावे आम्हाला माहित आहेत. शेतकरी गोवंशाबद्दल हळवा असतो आणि कृतज्ञदेखील असतो. गोवंश राजकारणाचा विषय ठरु नये अशी अपेक्षा व्यक्त करत काही जणं त्याला वेगळं वळण देत असतात, राजकारण करायचा प्रयत्न करतात असं अजित पवार म्हणाले आहे.

विद्यार्थीनीसमोर जोडले हात

देशी गोवंश पशू प्रदर्शनाच्या वेळी त्यांनी काही विद्यार्थिनींसोबत संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थीनीला अजित पवारांनी विचारले, तुम्ही राहता कुठे? यावर विद्यार्थीनीने सांगितले मी टेंभूर्नी, सोलापूर. तुम्हाला मेरिटवर अॅडमिशन मिळालं का? किती टक्के मिळाले? त्यानंतर त्या विद्यार्थीनीने म्हटलं, हो मेरिटवर मिळालं. ९९.१० % हे ऐकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या विद्यार्थनीसमोर हसत-हसत हात जोडले आणि म्हटले की, इथल्या विद्यार्थ्यांचे मार्क्स पाहून डोळेच पांढरे झाले, आमचे दोन वर्षांचे मिळून ही एवढे मार्क झाले नसते. पण कौतुक आहे तुमचं असंही अजित पवार म्हणाले आहेत.

रेड कार्पेटवरुन अधिकाऱ्यांची घेतली शाळा

या प्रदर्शनच्या वेळी जमिनीवर टाकण्यात आलेल्या रेड कार्पेटवरुनही त्यांनी अधिकाऱ्यांची शाळा घेतली आहे. ते म्हणाले की जमिनीची लेव्हल नीट झाली नाही. कार्पेट टाकलं पण, रानात चालल्यासारखं वाटलं. चेहरा चांगला दिसावा म्हणून मेकअप करायचा आणि मेकअप काढला की खरं रुप दिसतं असं म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025 : पितृपक्ष ७ सप्टेंबरपासून सुरू, या 4 राशींनी वेळीच जाणून घ्या उपाय; अन्यथा...

Maharashtra Live News Update : मुंब्रात इमारतीचा सज्जा कोसलळा, एका महिलेचा मृत्यू

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

SCROLL FOR NEXT