Mumbai Political News Saam Tv
मुंबई/पुणे

शिवसेनेत नाराजी; 'त्या' आदेशामुळे पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

नाराज झालेल्या डोंबिवली ग्रामीणच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

प्रदीप भणगे

डोंबिवली - २७ गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आल्यानंतर आता शिवसेनेकडून (Shivsena) देखील प्रशासकीय सोयीचे कारण देत डोंबिवली (Dombivli) ग्रामीणचा समावेश डोंबिवली शहर शाखेत करण्याचे आदेश जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी काढले आहेत. या आदेशानंतर नाराज झालेल्या डोंबिवली ग्रामीणच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

तर, राजीनामे देणारे बहुतांशी माजी आमदार सुभाष भोईर यांचे समर्थक असल्याचे शिवसैनिकांकडून सांगितले जात आहे. मात्र या प्रकरणावर कोणीही बोलायला तयार नाही आहेत.

हे देखील पाहा -

जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी काढलेल्या परिपत्रकात काय म्हंटले आहे...

या आदेशानुसार डोंबिवली शहर व डोंबिवली ग्रामिण विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांस सुचित करण्यात येते की, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांपैकी डोंबिवली ग्रामिण विभागातील सर्व गावांचा समावेश प्रशासकीय कामाच्या सोयीकरीता डोंबिवली शहर शाखेच्या माध्यमातून आज दि.१९/०४/२०२२ पासून कामकाज सुरु करण्यांत येत आहे.

शिवसेना पदाधिकारी यांचा राजीनामा पत्र

आपले दि.19/4/2022 रोजीचे परिपत्रक मिळाले. सदर परिपत्रकानुसार डोंबिवली ग्रामिण मधिल पक्ष संघटनेचा प्रशासकीय कामकाज पत्राच्या तारखेपासुन डोंबिवली शहर शाखेमधुन होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासुन ग्रामिण विभागातील पक्षाचे काम ग्रामिणच्या

पदाधिकाऱ्यांच्या मार्फत चालत होता. प्रत्येक विभागातील पदाधिकारी प्रमाणिकपणे आपल्यावरील जबाबदारी निभावत होते. दि.19/4/2022 च्या आपल्या परीपत्रकानुसार पुढे आमच्यावर कोणतीच जबाबदारी नाही हे स्पष्ट आहे. त्या कारणाने कोणतीच जबाबदारी नसेल तर त्या पदांना काही अर्थ नाही म्हणुन आम्ही स्वखुशिने आमच्यावर असलेल्या पक्षाच्या पदांच राजीनामा देत आहे. आपण आजपर्यंत आम्हा सर्वांवर जी जबाबदारी दिलीत. आमच्या कुवतीनुसार आम्ही ती पार पाडण्याचा प्रयत्न केला. कामच्या ओघात काही चुका झाल्या असतील तर त्या पोटात घ्यावी ही आमची नम्र विनंती.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

15 लाखाच्या पगारावर आता 1 रुपया ही टॅक्स नाही, वाचा ही ट्रिक

Instagram: इन्स्टाग्राम युजर्सचे टेन्शन वाढलं, १.७६ कोटी अकाऊंट्सचा डेटा लीक, तुम्हाला 'हा' मेसेज आला तर चुकूनही...

Maharashtra Live News Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Archana Puran Singh: अर्चना पूरन सिंहला झालेला गंभीर CRPS आजार नेमका आहे तरी काय? जाणून घ्या एका क्लिकवर

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

SCROLL FOR NEXT