Cobra Snake Viral Video प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Video: कल्याणच्या रेल्वे लोको शेडमध्ये आढळला कोब्रा नाग; कामगारांची झाली पळापळ

Cobra Snake Viral Video: सर्पमित्र दत्ता हे घटनास्थळी दाखल होऊन या कोब्रा नागाला शिताफीने पकडून पिशिवत बंद केले.

प्रदीप भणगे

Kalyan Viral News: साप म्हटलं अनेकांना धडकी भरते. सापाचं नुसतं नाव ऐकलं तरी अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यात तो साप जर जगातला सर्वात विषारी साप, म्हणजे किंग कोब्रा असेल कर मग विचारायलाच नको. असाच एक व्हिडिओ समाेर आला आहे. कल्याण रेल्वे लोको शेडमध्ये दिवस रात्र इंजिन आणि डब्बे दुरुस्तीचे काम शेकडो कामगारांकडून सुरु असते. त्यातच रात्र पाळीत कामगार काम करत असताना भक्ष्याच्या शोधात कोब्रा नाग (King Cobra Snake) लोको शेडमध्ये शिरला होता. त्यावेळी एका कामगाराला भिंतीच्या पाईपवर कोब्रा नाग फणा काढून बसल्याचे दिसला आणि त्याला धक्काच बसला. (Kalyan Latest News)

या कोब्रा नागाला पाहून त्याने लोकोशेडमध्ये (Kalyan) कोब्रा नाग घुसल्याची ओरड करताच सर्व कामगारांनी काही काळ काम बंद करून या नागाच्या भीतीने बाहेर पळ काढला. तर कमलाकर सूर्यवंशी नावाच्या कामगाराने सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संर्पक करुन लोको शेडमध्ये कोब्रा नाग शिरल्याची माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र दत्ता हे घटनास्थळी दाखल होऊन या कोब्रा नागाला शिताफीने पकडून पिशिवत बंद केले.

पाहा व्हिडिओ -

कोब्रा पकडल्याचे पाहून कामगारांनी सुटकेचा निश्वास घेतला. हा कोब्रा नाग साडेतीन फूट लांबीचा असून अत्यंत विषारी इंडियन कोब्रा जातीचा आहे. दरम्यान या नागाला कल्याण वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने आज सकाळी निर्सगाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबई विमानतळ अन् मुंबई मेट्रो-३ चे उद्घाटन

Navi Mumbai Airport : नवी मुंबई, नवं उड्डाण! पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज विमानतळाचे लोकार्पण

Zodiac Signs Today: बुधाचा उच्चस्थानी योग, सूर्य-चंद्राचा संयोग; या ४ राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास

Gold Rate : सोनं प्रति तोळा ७७ हजारांवर येणार, धक्कादायक कारण आलं समोर, वाचा...

Mosquitoes : दारू पिणारे डासांना चावायला आवडतात? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT