Coastal Road Mumbai AI generated image
मुंबई/पुणे

Mumbai Coastal Road : सागरी मार्गावरचा प्रवास होणार 'BEST'; एसी ई बस लवकरच धावणार

Mumbai Coastal Journey : कोस्टल रोडवर एसी इलेक्ट्रिक बस धावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईतील सागरी मार्गावरचा प्रवास आता एकदम 'बेस्ट' आणि 'ठंठा ठंडा कूल कूल' होणार आहे. अर्थात बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात साधारण १०० इलेक्ट्रिक एसी बस येणार आहेत. याशिवाय प्रवाशांच्या मागणीनुसार, त्यातील काही बस मुंबईच्या सागरी मार्गावरून धावण्याची शक्यता आहे.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात जवळपास १०० इलेक्ट्रिक एसी बसचा समावेश करण्यात येणार आहे. त्यातील काही बस या सागरी मार्गावरून धावू शकतात. मरीन ड्राइव्ह ते ब्रीच कँडी, वरळी आणि नंतर वांद्रे-वरळी सागरी सेतूमार्गे वांद्रेला जोडणाऱ्या १०.६ किलोमीटरच्या सागरी मार्गावरून (कोस्टल रोड) जाणाऱ्या विविध मार्गांसाठी सर्वेक्षण केले जात आहे.

यापूर्वी, बेस्टने नरिमन पॉईंट ते भायखळापर्यंत कोस्टल रोडने एसी बस सुरू केली होती. ती ब्रीच कँडीमार्गे जात होती. हा मार्ग पुन्हा सुरु केला जाऊ शकतो. नरिमन पॉईंट ते मरिन ड्राइव्हच्या बाजूने वांद्र्यापर्यंत बस चालवण्याची शक्यता देखील आहे. कफ परेड आणि दक्षिण मुंबईच्या इतर भागांपासून विमानतळापर्यंत बेस्टची एसी चलो बस सेवा सुरू होती. परंतु, ती बंद करण्यात आली. विमानतळावर ये-जा करणाऱ्या अनेक प्रवाशांनी हा मार्ग सुरू करण्याची मागणी केली आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, बेस्ट सध्या कोस्टल रोडद्वारे सुरू करता येणाऱ्या मार्गाबद्दल नागरिकांकडून त्यांची मते जाणून घेण्यात येत आहेत. कारण त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होईल. नियमित बसने प्रवास करणारे अजय कुलकर्णी म्हणाले, कोस्टल रोडमुळे मोटरचालकांना मरीन ड्राइव्ह ते वांद्रे असा प्रवास कमी वेळात करता येईल, जो पूर्वी ३०-४० मिनिटांचा होता.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबई मोबिलिटी फोरमचे अशोक दातार यांच्या मते, कोस्टल रोड पूर्णपणे कार्यान्वित झाल्यामुळे, या मार्गावर आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सेवा देणाऱ्या बसच्या वेळेत सुधारणा होऊ शकते. आपण बसच्या ताफ्यात असलेल्या सध्याच्या एसी बसचे गांभीर्याने परीक्षण करायला हवे. प्रत्येक बसने प्रत्येक चार्जसाठी किमान २२० किलोमीटर अंतर कापले पाहिजे, असे दातार म्हणाले.

सध्या, बेस्ट परवडणाऱ्या दरात प्रवासाची सुविधा देत आहे. एसी बसचे तिकीट ५ किलोमीटरसाठी ६ रुपये, नॉन-एसी बसमध्ये ५ किलोमीटर प्रवासासाठी किमान ५ रुपये आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रवास जलद व्हावा, तसेच हाजीअली आणि मरीन ड्राइव्ह या दोन ठिकाणांना जोडण्यासाठी कोस्टल रोडवर बस सुरू करण्याची योजना आहे.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Day 5: आजच्या दिवशी स्कंदमाता देवीला कमळाचे फूल अर्पण करा, तुमच्या इच्छा- आकांक्षा होतील पूर्ण

Maharashtra Live News Update: जिल्हा परिषद रोस्टरविरोधातली याचिका नागपूर खंडपीठानंतर सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Ladki Bahin Yojana: ८ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला 'लाडकी'चा लाभ, सरकार प्रत्येकी ₹२१००० परत घेणार

Budget Plan: जिओनंतर 'या' कंपनीने दिला धक्का! लोकप्रिय आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन आता बंद

Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

SCROLL FOR NEXT