ajit pawar
ajit pawar Saam TV
मुंबई/पुणे

Breaking.. सहकारी कारखान्याला हमी द्यायची नाही; राज्य सरकारचा मोठा निर्णय

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई: राज्यातील कोणत्याही कारखान्यांना हमी द्यायची नसल्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला असल्याची घोषणा आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधान सभेत केली आहे. आता इथून पुढे राज्य सरकारवर कारखाने अवलंबून राहू नयेत, असही त्यांनी म्हटलं आहे.

कारखाने काढायचे असतील तर खासगी काढा सरकार काही देणार नाही असे विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh)असतानाच त्यांनी सांगितले होते. आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हटले आहेत आता इथून पुढे साखर कारखान्यांना हमी द्यायची नाही. कारखानादारी चालावी पण सरकार प्रत्येकवेळी हमी घेणार नसल्याचे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

यावेळी अजित पवार यांनी साखर कारखान्याचे अर्थकारण सांगितले. नवीन कारखाने निघाले नसते वाईट अवस्था झाली असते. आम्ही शेतकऱ्यांची देणी भागवण्यासाठी कर्ज काढले लागले असल्याचेही ते म्हणाले.

मागच्या वर्षी आम्ही पाच कारखान्यांना हमी दिली होती. यात आम्ही भेदभाव केला नव्हता, महाविकास आघाडी सरकारमध्येही पहिले दोन-चार महिने अशी हमी देण्यात आली होती. त्यात पंढरपूर येथील कारखाना, कल्याणराव काळे यांचा कारखाना, धनंजय महाडिक यांचा कारखाना, संग्राम टोपे अशा पाच कारखान्यांचा समावेश आहे. मात्र, त्यानंतर गेल्या अडीच वर्षांपासून सहकारी साखर कारखान्यांना सरकारी हमी देण्याची पद्धत बंद केली आहे. असही पवार (Ajit Pawar) म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, नेमकं काय घडलं?

Keratin Treatment: केसांवरील केराटीन ट्रिटमेंट शरिरासाठी ठरेल घातक; 'हा' गंभीर आजार होण्याची शक्यता

Uttar Pradesh News: अंघोळ करणाऱ्या महिलेला चोरून बघणारा जिवानीशी गेला; टेरेसवर तरूणासोबत घडलं भयंकर

Govinda Marathi Speech | गोविंदाचं मराठीतून भाषण ऐकलंत का?

Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर हद्दीत कारचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT