CNG rate hike Saam tv
मुंबई/पुणे

सर्वसामान्यांना मोठा झटका; CNG च्या दरात वाढ, आज रात्रीपासून लागू होणार नवीन दर

CNG rate hike : सर्वसामान्यांना मोठा धक्का बसलाय. CNG च्या दरात वाढ झाली आहे. नवीन दर आज रात्रीपासून लागू होणार आहे.

Vishal Gangurde

एलपीजी गॅसनंतर सीएनजी दरातही वाढ

सीएनजी दरात प्रति किलो २ रुपयांनी वाढ

दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका

इराण-अमेरिका युद्धामुळे एलपीजी गॅसचे दर वाढले आहे. खासगी कंपनीच्या पंपावर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. त्यानंतर सर्वसामान्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आता आज गुरुवारी रात्रीपासून सीएनजी दरातही वाढ होणार आहे. सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे.

जगात युद्धामुळे अस्थिर वातावरण निर्माण झाल्याने कच्चा तेलाची किंमत आणि रुपया-डॉलर विनिमय दरावर परिमाण झाला आहे. यामुळे जागतिक बाजारात दररोजच्या खर्चावर परिणाम दिसत आहे. काही शहरांमध्ये इंधनाचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी वाढ इंधनाचे दर वाढताना दिसत आहे.

युद्धाची झळ आता आपल्या घरापर्यंत पोहोचू लागली आहे. पुण्यात सीएनजीचे दर दोन रुयांनी वाढले आहेत. त्यामुळे आता सीएनजीचे नवीन दर ९४. ५० रपये प्रति किलो रुपयांनी वाढले आहेत. नवीन दर आज गुरुवारी रात्री बारा वाजल्यापासून लागू होणार आहेत. काल पर्यंत 92.50 प्रति किलो प्रति किलो मिळणारा सीएनजी २ रुपयांनी महागला आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे.

शेल इंडिया आणि नायरा एनर्जी कंपनीने इंधन दरात केली वाढ

इराण-इस्रायल युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेल इंडिया आणि नायरा एनर्जी या कंपनीने पेट्रोल पंपावर इंधन दरात मोठी वाढ केलीये. या दरवाढीमुळे डिझेल प्रति लिटर तब्बल २५ रुपयांनी महागलं आहे. तर पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ७ रुपये ४१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. या भाववाढीचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात मृत्यूचं तांडव! स्कॉर्पिओ दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

Fact Check: एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस? ट्रकमधून नोटा पडतानाचा व्हिडिओ व्हायरल

कृष्णा नदीत सापडला 40 किलोचा महाकाय मासा; बघायला लोकांची मोक्कार गर्दी, VIDEO

विठ्ठलाच्या जागेवर बडव्यांचा दावा; 450 कोटींच्या जमिनीवरून वाद पेटला

MHADA Lottery: मुंबईत घ्या हक्काचं घर! म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी ३ दिवस शिल्लक; कुठे अन् कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT