Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

CM Uddhav Thackeray: महाराष्ट्राला धक्का लागला, तर देशाच्या आर्थिक व्यवस्थेला धक्का लागेल, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे -

मुंबई: आज गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील वडाळा येथे वस्तू व सेवा कर भवन म्हणजेच जीएसटी भवन याचे भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, पालक मंत्री आश्रम शेख, मंत्री एकनाथ शिंदे सह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की आजचे भूमिपूजन फक्त नारळ फोडायला नाही आहे, तर प्रत्यक्ष कामाची सुरुवात आहे. तसेच, काहींना हे सरकार पाडण्याशिवाय दुसरे काही सुचत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले (CM Uddhav Thackeray At Bhumi Pujan program of GST Bhavan).

एक वातावरण तयार केल जातंय की सरकार मध्ये रुसवे फुगवे आहेत. पण, सरकारचे नाव महाविकास आघाडी असं आहे. कोणतेही रुसवे फुगवे नाहीत, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackeray) दिलं.

आजच्या भवनचे श्रेय मी अजित दादांना (Ajit Pawar) देतो. जे काय संकल्पचित्र दाखवले त्यासाठी तर अप्रतिम असा शब्द सुचतो. आजचे भूमिपूजन फक्त नारळ फोडायला नाही आहे, तर प्रत्यक्ष कामाची सुरुवात आहे. काहींना हे सरकार पाडण्याशिवाय दुसरे काही सुचत नाही. कामाची गुढी ते उभारु शकत नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

कर संकलन करण्यामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांक वर आहे. म्हणजे देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्रचा वाटा मोठा आहे. हे बजबजपुरी करत आहेत त्यांना सांगू इच्छितो की, महाराष्ट्राला धक्का लागला, तर देशाच्या आर्थिक व्यवस्थेला धक्का लागेल. मला राजकारणावर बोलायचं नव्हते पण बोलावं लागतं, असंही ते म्हणाले.

नुसते कष्ट करत आहोत. पण, तरीही बदनामी करत आहेत. पण त्या बदनामी ला छेद देऊन आपण काम करु. जीएसटी भवन असं करु, की ते पाहायला लोक आले पाहिजे. ज्यावेळी आपण खात्याचे कौतुक करतोय, त्या करदात्याला समाधान वाटलं पाहिजे. आपण जी काय कामं पहिली ती सर्वोत्तम आहेत. जे अधिकारी चांगल काम करतात त्यांचे कौतुक आणि प्रशिक्षण करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

आम्ही सरकार मधील सर्व घटक एकजुटीने काम करत आहोत. अजित दादा जिथे तुम्ही स्वतः आहात तिथे मला येण्याची गरज नाही कारण आपण एकत्र अहोत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना उत्तर दिलंय. मुख्यमंत्री महोदय हे बरं नाही कि आमच्याकडे हे खाते आहे आणि तुम्ही इथे स्वतः उपस्थित नाही राहिलात आणि मराठी भाषा भवन ला स्वतः उपस्थित राहणार, असं अजित पवार म्हणाले होते.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: माजी मंत्री आमदार राजेद्र शिंगणे यांना अजित पवारांचा फोन

VIDEO : फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करण्याचं धाडस भाजपात नाही; रोहित पवारांची जोरदार टीका

Kalyan : सुट्ट्या पैशांवरुन वाद टोकाला; रागाच्या भरात प्रवाशाची महिला बुकिंग क्लार्कला बेदम मारहाण, कल्याण रेल्वे स्टेशनवरील घटना

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचा महायुती, नारायण राणेंना मोठा धक्का; राज्यातील २ दिग्गज नेत्यांनी हाती धरली मशाल, कशी असेल लढाई?

Radhika Merchant लग्नानंतरचा पहिला वाढदिवस 'असा' केला साजरा

SCROLL FOR NEXT