CM Shinde Announces Rs 10 Aid to Families of Pune flood Victims Saam tv
मुंबई/पुणे

राज ठाकरे यांची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ केली पूर्ण, त्या पीडित कुटुंबियांना दिली मोठी मदत

Saam Tv

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने केलेली मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या काही तासात पूर्ण केली आहे. पुणे येथील प्रलयंकारी पुरात जीव गमवावा लागलेल्या दोन तरुणांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या काही तासात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर केली आहे.

पुणे येथे गेल्या आठवड्यात मुळा नदीला आलेल्या पुरात दोन तरुण विजेचा धक्का लागून मृत्यूमुखी पडले होते. डेक्कन जिमखाना येथील पुलाची वाडी येथे राहणाऱ्या अभिषेक घाणेकर आणि आकाश माने या तरुणांचा यात मृत्यू झाला होता.

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पुण्यात आलेल्या पुराबाबतही चर्चा झाली. यावेळी पुण्यातील याच पुरात या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बाब त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली.

त्याना यापूर्वीच पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य आपत्ती निवारण निधीतून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र या दोन्ही तरुणांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने ही मदत त्यांना पुरेशी नसल्याचे राज यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ या दोन तरुणांना विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 10 लाखांची मदत करण्याचा निर्णय घेतला.

ही बैठक होताच मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हे मदतीचे धनादेश वर्षा बंगल्यावर मागवून घेतले. हे धनादेश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनसे शिष्टमंडळातील आबा येडगे आणि रणजित शितोळे यांना प्रतिनिधिक स्वरूपात सुपूर्द करण्यात आले. ही मदत हे दोघे या दोन तरुणांच्या कुटूंबियांपर्यंत पोहचवणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

SCROLL FOR NEXT