Vedanta-Foxconn Matter CM Calls PM Saam TV
मुंबई/पुणे

Vedanta-Foxconn: 'वेदांता' प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा मोदींना फोन; गुंतवणुकीबाबत मोठी मागणी

'फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे.'

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

Vedanta Foxconn Project: महाराष्ट्रात दोन लाख कोटींची गुंतवणूक असणारा आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा महत्वपूर्ण 'वेदांता' ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प गुजरातमध्ये (Gujarat) गेल्याने राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे.

सध्याचे शिंदे सरकार हे गुजरात धार्जिणे असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर हा प्रकल्प गुजरातमध्ये जाण्यास महाविकास आघाडी सरकारच कारणीभूत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.

या सर्व प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री फोन करत वेदांता उद्योग प्रकल्प आणि गुंतवणुकीबाबत सहकार्य करा असी विनंती केली असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.

पाहा व्हिडीओ -

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी पंतप्रधान मोदींना (Narendra Modi) फोन करत वेदांचा उद्योग प्रकल्प आणि गुंतवणुकीबाबत सहकार्य करण्याची विनंती केली आहे. शिवाय महातष्ट्रातील परदेशी गुंतवणुकीबाबत सहकार्य करण्याची विनंती देखील मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. त्यामुळे आता गुजरातला गेलेला प्रोजेक्ट राज्यात परतणार का मुख्यमंत्र्यांचा फोन काम करणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागूण राहिलं आहे.

प्रकल्प राज्यातून निसटलाच कसा? - राज ठाकरे

फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केला आहे.

शिवाय हा प्रकल्प जाण ही गंभीर बाब असून या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं अश परखड भूमिका राज यांनी मांडली आहे.

राजकीय दबावापोटी प्रकल्प गुजरातला - अजित पवार

राज्यात सत्तांतर होताच महाराष्ट्राच्या हिताचा असणारा हा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये नेण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारवर केला आहे. महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे राज्याचे ‘जीएसटी’चे सुध्दा मोठे नुकसान होणार असल्याचंही पवार म्हणाले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World Hepatitis Day: हिपॅटायटीस टाळण्यासाठी हे सोपी उपाय नक्की करा

Parliament Monsoon Session: 'ऑपरेशन सिंदूर' का थांबवलं? परत सुरू होणार का ऑपरेशन? संरक्षण मंत्र्यांनी लोकसभेत दिलं उत्तर

Kalyan : बनावट फोटो लावून जमिनीचा डेव्हलपमेंट करार, ११ जणांवर गुन्हा दाखल; कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार

Roshani Walia : 'सन ऑफ सरदार २' मध्ये झळकणारी रोशनी वालिया कोण आहे?

Women Travel Tips: परदेशी प्रवास करताना महिलांनी कोणते कपडे घालू नयेत?

SCROLL FOR NEXT