Mumbai News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राज्यातील राजकीय परिस्थिचीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
राज्य मंत्रिमंडळ विस्तार, आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठक चर्चा झाल्याचे अंदाज बांधले जात होते. मात्र बैठकीत नेमकं काय झालं याची अधिकृत माहिती समोर आली नव्हती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीची बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती ट्वीट करत दिली आहे.
कृषि, सहकार विभाग, शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध विषयांवर बैठकी चर्चा झाली. तसेत रखडलेली विकासकामे मार्गी लावण्याबाबतही सविस्तर चर्चा झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. (Maharashtra Political News)
मुख्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं?
काल, रविवारी रात्री मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली. (Latest Marathi News)
आगामी सर्व निवडणुका एकत्र लढणार
राज्यात आगामी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, राखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढवणार आणि बहुमताने जिंकणार.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.