uddhav thackeray  saam tv
मुंबई/पुणे

माझ्या जागी दुसरा कुणी असता तर हर्ट अटॅक नक्कीच आला असता; एकनाथ शिंदेंनी सांगितला 'तो' किस्सा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडी स्थापन करत असताना उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेचा किस्सा सांगितला.

Vishal Gangurde

Eknath Shinde News : शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा दोन दसरा मेळावे झाले. शिवसेनेच्या शिंदे गटाने बीकेसी मैदानावर भवदिव्य दसरा मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवाजी पार्कवरून केलेल्या भाषणालाही प्रत्युत्तर दिलं. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडी स्थापन करत असताना उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेचा किस्सा सांगितला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'शरद पवारांनी उद्धव ठाकरेजी व्हावं लागेल असं सांगितलं. तुम्ही मला त्याबाबत सांगितलं. याच इथल्या सोफीटेल हॉटेलमध्ये सांगितलं की, शरद पवार साहेब मला मुख्यमंत्री व्हावं असं सांगत आहेत. त्यावेळी माझ्या जागी कुणी असता तर हर्टअटॅकन गेला असता. एकनाथ शिंदेला पदाची लालसा नाही. मी तुम्हाला हो मग काय अडचण आहे असं म्हटलं. मला कुठे मुख्यमंत्री व्हायचं आहे, मला कुठे ते जमणार आहे असं म्हटलं'.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, 'एकीकडे पक्ष आहे, पण अध्यक्ष नाही. इकडे अध्यक्ष आहे पक्ष नाही. नरेंद्र मोदींनी देशावर भुरळ घातली आहे. या देशाचा प्रधानमंत्री यांची टिंगल करता. गृहमंत्र्यांना अफजल खान म्हणाले. पण त्यांनी ३७० हटवले जे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केले. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी पूर्ण केले'.

'मोदींना चहावाला म्हटलं, त्या पक्षाची आज काय अवस्था आहे ? नारायण राणे जेवत असताना तु्म्ही त्यांना ताटावरून उठवले. तुम्ही म्हणता मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. तर होय मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. या राज्याला सुजलाम सुफलाम करण्याचा कंत्राट मी घेतले. हे सरकार योग्य कंत्राट दराच्या हाती गेलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आज तुम्हाला मित्र वाटतात. प्रत्येक भाषणात काँग्रेस-राष्ट्रवादीवर बाळासाहेब ठाकरे यांनी टीका केली होती', असे ही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SBI Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार स्टेट बँकेत नोकरी; पगार ९३,९६० रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : एकनाथ शिंदेंच्या नेत्यांना आवरा - जैन मुनी

ED Raids : ईडीची रिलायन्सवर मोठी कारवाई, अंबानींच्या विश्वासूला ठोकल्या बेड्या

Crime: मित्रासोबत जेवायला कॉलेजबाहेर गेली, वाटेत तिघांनी अडवलं अन् ओढत जंगलात नेलं, MBBS च्या विद्यार्थिनीवर बलात्कार

Karanji Recipe: करंजी तेलात सोडताच फुटते? या सोप्या ट्रिक्स वापरा अन् दिवाळीत तुमच्याच फराळाची चर्चा

SCROLL FOR NEXT