Maharashtra Political News Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Political News: ठाकरेंना घेरण्यासाठी शिंदेंची नवी खेळी; मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राने आखली नवी रणनीती

Vishal Gangurde

Shrikant Shinde News: एकीकडे आदित्य ठाकरे वारंवार मुंख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठाण्यातून निवडणूक लढवण्याचं आव्हान देत असताना शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे मुंबईच्या मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी थेट ठाकरेंना आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे.

श्रीकांत शिंदे आता मुंबईचा कानाकोपरा पिंजून काढत आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी त्यांनी प्रभादेवी, दादर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातल्या शिवसैनिकांनी संवाद साधला. तसेच 'सामना' कार्यलयाच्या समोर असलेल्या शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या शाखेला भेट देत ठाकरेंना आव्हान दिलं. (Latest Marathi News)

शिंदे गटाच्या मिशन मुंबईसाठी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे मैदानात उतरले आहेत. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी श्रीकांत शिंदे यांनी खेळी आखण्यास सुरूवात केली आहे. मुंबईत श्रीकांत शिंदे यांनी 'शाखा संपर्क' अभियान राबवत ठाकरे गटाला जोरदार आव्हान दिलं आहे. शिवसेना शाखा संपर्क अभियानाच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे मुंबईतल्या शिवसेनेच्या शाखांना भेट देत आहेत. मुंबईत श्रीकांत शिंदे हे अनेक शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत.

मुंबईत कोणाचं वर्चस्व ?

मुंबईत शिवसेनेच्या जवळपास 227 शाखा आहेत. तर मुंबई महानगर प्राधिकरणात ठाण्यासह जवळपास 500 शाखा आहेत. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंसोबत त्यांचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी दोन गटात विभागले गेलेत. शिंदेंच्या बंडानंतरही शिवसेनेची खरी ताकद असलेल्या मुंबईतल्या बहुतांशी शाखांवर आजही ठाकरे गटाचं वर्चस्व आहे.

गेल्या निवडणुकीत मुंबईत शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सात नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईत विधासभा आणि लोकसभेत शिवसेनेची ताकद भाजपच्या तुल्यबळ आहे. शिंदेंच्या बंडानंतर आता त्यात फूट पडली आहे. 2019 मध्ये मुंबईत 36 पैकी शिवसेनेचे 13 आमदार निवडून आले होते. त्यापैकी 6 आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

मुंबईत लोकसभेचे सहापैकी तीन जागा शिवसेनेनं मिळवल्या होत्या. त्यापैकी खासदार गजानन कीर्तिकर, राहुल शेवाळे शिंदेंसोबत गेलेत. तर अरविंद सावंत ठाकरेंसोबत आहेत.

एकंदरीत शिंदेंच्या बंडानंतरही मुंबईत ठाकरेंची ताकद कायम आहे. ठाकरेंची ताकद शिंदेंसाठी डोकेदुखी आहे. वातावरण अनुकूल नसल्यानं सरकार महापालिका निवडणुका घेण्याचं धाडस करत नसल्याचा आरोप होत आहे. अशा वेळी मुंबई पिंजूंन काढून ठाकरेंना शह देण्याचा शिंदेंचा प्रयत्न यशस्वी होणार का, हे निवडणुकीच्या मैदानातच समजेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT