Eknath Shinde vs Uddhav Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde VS Uddhav Thackeray: 'वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या...';उद्धव ठाकरेंच्या टीकेला CM शिंदेंचं खणखणीत प्रत्युत्तर

Eknath Shinde News: उद्धव ठाकरे यांच्या याच टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Vishal Gangurde

Eknath Shinde News: उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष संपता संपेना झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज कामगार सेनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरे यांच्या याच टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

'वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही,त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे…., अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. (Latest Marathi News)

कामगार सेनेच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. 'ती जोडे बनवणारी कंपनी देखील तामिळनाडूत गेली, हे बसलेत जोडे पुसत, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती.

उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, 'काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात'.

'चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे…, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

'केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील, हे नक्की, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर काय देतील, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

When to do heart checkup: भारतातील 30% मृत्यू हार्ट अटॅकमुळेच! धोका टाळण्यासाठी कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आणि कधी?

Vice President Election : उपराष्ट्रपतींची निवडणूक कशी होते? नेमकी प्रक्रिया काय असते? जाणून घ्या सविस्तर

UPI Payment: आता पिनशिवाय होणार UPI पेमेंट, फक्त तुमच्या फेस लॉकने

SCROLL FOR NEXT