सचिन जाधव
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात बंडाळीनंतर राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील दौरे सुरू केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आज मुख्यमंत्र्यांचा दौरा पुण्याच्या पुरंदरमध्ये पोहोचला. आजच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.'माझ्यावर लोक आरोप करत आहेत, पण मला निवडून यायला कोणत्याही चिन्हाची गरज नाही, एवढं मी काम करून ठेवलं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'राज्यात भाजप-सेना सरकार आलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आलं आहे. अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन यांच्या विचारांचं सरकार आलं आहे. आपण शिवसेना-भाजप एकत्र लढलो. एकीकडे बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून निवडणुका लढलो.भाजपचे १०५ अन् शिवसेना ५६ निवडून आले. जनतेने स्पष्ट बहुमत दिले. भाजप-सेना सत्ता राज्यात येईल, असं सगळ्यांना वाटलं. पण तसे झाले नाही. पण आपण बाळासाहेबांचा आदेश मानणारे आहोत. पण नंतर काय घडलं हे सर्वांनी पाहिलं'.
मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं.'ते भेटायला मलाच भेटत होते, कारण बाकी कोणाकडे भेटयाला वेळ नव्हता, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर टीका केली. 'माझ्यावर लोक आरोप करत आहेत, पण मला निवडून यायला कोणत्याही चिन्हाची गरज नाही, एवढं मी काम करून ठेवलं आहे. आम्ही हा निर्णय का घेतला, तर निवडून आलेले एवढे शिवसेना आमदार पराभूत झाले असते. निवडून यायला कामे करावी लागतात. आम्हाला निधी मिळत नव्हता', असे ते म्हणाले.
'मी एक बाळाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा सच्चा शिवसैनिक आहे. माझ्या शिवसैनिकांसाठी काम करणार आहे. महाविकास आघाडीत असताना नगरविकास विभाग मार्फत जेवढं करायचं, तेवढं करू लागलो. माझ्या विभागात जे घडलं ते बोलायचं नाही, बोलणार नाही, पण कार्यकर्त्यांचं काम करत नसतील तर सत्ता कशासाठी ? अन् कोणासाठी आहे. कशासाठी ?. भाजप-सेना एकत्र असती तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस औषधाला पण नसती राहिली', असेही ते पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.