eknath shinde and jitendra awhad
eknath shinde and jitendra awhad  saam tv
मुंबई/पुणे

पोलीस पारदर्शक चौकशी करतील, जितेंद्र आव्हाडांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचं उत्तर, तर आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना दिला इशारा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)   यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका महिलेने त्यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. पोलीस नोंदवलेल्या गुन्ह्याची नियमानुसार पारदर्शक चौकशी करतील, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

कोणतीही कारवाई सूडबुद्धीने होणार नाही. जितेंद्र आव्हाड यांना हे षडयंत्र वाटत असेल तर हे कुणी केलं त्यांना माहिती असेल. राजकीय सूड भावनेने कुठलीही कारवाई नाही हे कायद्याचे राज्य आहे. लोकशाही मार्गाने दाद मागायला हवी, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. जितेंद्र आव्हाड यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याबाबत मला माहिती नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

आक्रमक कार्यकर्त्यांना इशारा

जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला. नियमानुसार काम करणारं हे सरकार आहे. आंदोलन ठिक आहे, मात्र कुणी कायदा हातात घेतला तर कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतलं जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण होऊ नये- जितेंद्र आव्हाड

माझा जन्म 354 आणि 376 साठी झालेला नाही. माझ्यावर कोणताही आरोप केला असता तर चाललं असत पण 354 मला मान्य नाही. मी आयुष्यात असं काही करू शकत नाही. समाजात माझी मान खाली जाईल असा गुन्हा माझ्यावर टाकला जात असून हा कटाचा भाग असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

354 चा गुन्हा दाखल झाल्यावर माझ्या मुलीला अनेक जण प्रश्न विचारत आहेत. एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण होऊ नये. ही कारवाई माझ्या मनाला लागली आहे. समाजात माझी बदनामी करण्यसाठी हे षडयंत्र असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. माझ्यावर खुनाचे षडयंत्र रचल्याचा आरोप लावला असता तरी चालले असतं. माझ्याविरोधात ओढूनताणून गुन्हा नोंदवला जात आहे. विनयभंगाचा आरोप मान्य नाही, त्यापेक्षा राजकारणात नकोच असंही आव्हाड यांनी म्हटले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : अमरावतीत वादळी पाऊस, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Rajasthan News: भयंकर! साखळी तुटल्याने लिफ्ट १८०० फूट खोल खाणीत कोसळली; १४ जण अडकले, बचावकार्य सुरू

Narendra Modi Sabha: मोठी बातमी! मोदींच्या सभेआधी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नोटीसा; पोलिसांकडून अनेकांची धरपकड

Madhuri Dixit Net Worth : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण! जाणून घ्या नेटवर्थबद्दल

Narendra Modi: PM मोदी आज पुन्हा महाराष्ट्रात येणार, कल्याण अन् दिंडोरीत जंगी सभा घेणार; मुंबईत करणार रोड शो

SCROLL FOR NEXT