Uddhav Thackeray vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Thackeray VS Shinde: सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड केली त्यांनी आम्हाला शिकवू नये, एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

आम्हाला शिकवायचा तुम्हाला अधिकार नाही. हा एकनाथ शिंदे स्वतः ४० दिवस तुरुंगात गेला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यातील सध्याच्या स्थितीबाबत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उत्तर दिलं आहे.

ज्यांनी सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड केली, त्यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही जे दिवसरात्र काम करत आहोत, हे पाहून यांच्या पायाखालची वाळू सारकली आहे, असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.

सीमावर्ती भागातील प्रश्नबाबत बोलतांना त्यांनी म्हटलं की, कर्नाटकचा विषय हा २०१२ चा आहे. इतक्या वर्षांत तुम्ही या सीमाप्रश्नी काय निर्णय घेतला. आम्हाला शिकवायचा तुम्हाला अधिकार नाही. हा एकनाथ शिंदे स्वतः ४० दिवस तुरुंगात गेला. (Latest Marathi News)

आम्ही सीमावर्ती भागातील नागरिकांना न्याय देण्यासाठी काम करत आहोत. सीमावर्ती भागातील आमच्या बांधवासाठी आम्ही योजना केल्या आहेत. महाराष्ट्राचा एकही तुकडा कुठेही जाणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही तो कुणीही सहन करणार नाही. पण सत्तेच्या खुर्चीसाठी ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले ते आमच्यावर टीका करतात. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही चालत आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

आत्मविश्वास होता म्हणून तर 50 आमदार आणि 13 खासदार माझ्यासोबत होते. हात दाखवयचा विषय म्हणाल तर आम्ही ज्यांना हात दाखवायचा आहे त्यांना 30 जूनला दाखवला आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

MNS Manifesto: आम्ही हे करु! गडकिल्ले, रोजगार ते महिलांची सुरक्षा, मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

SCROLL FOR NEXT