Eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai: निवडणुक आयोगाच्या निर्णयावर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; 'हा विजय...'

राज्याच्या राजकारणातून सध्या अत्यंत महत्वाची माहिती समोर येत असून निवडणुक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यभान चिन्ह शिंदे गटाला दिले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Eknath Shinde: राज्याच्या राजकारणातून सध्या अत्यंत महत्वाची माहिती समोर येत असून निवडणुक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यभान चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून याकडे लक्ष लागले होते. ७८ पानांची निवडणूक आयोगाचे निकालपत्र असून ऑक्टोबर २०२२ पासून हे प्रकरण चर्चेत आले होते.

याशिवाय शिवसेना नाव देखील एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्हीही शिंदे यांना मिळाल्यानं आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाले एकनाथ शिंदे....

निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर बोलताना एकनाथ शिंदे (EKnath Shinde) यांनी "हा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय झाला आहे. तसेच हा भारतीय घटनेचा आणि लोकशाहीचा विजय आहे, लोकशाहीत बहुमताला महत्व असते, त्यामुळे जो संघर्ष केला, बाळासाहेबांची विचार भूमिका घेवून सत्ता स्थापन केली. त्याचा हा विजय आहे," अशी प्रतिक्रिया दिली आहे...

दरम्यान, निवडणुकी आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे यापुढे ठाकरे गट काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या निर्णयानंतर आता शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचाही मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard : पुण्यानगर नगरमध्येही बिबट्याचा हल्ला, ४ वर्षाच्या चिमुकलीचा घेतला बळी

Maharashtra Live News Update: एसटी महामंडळ विकणार पेट्रोल

Bihar Elections : बिहारमध्ये १२१ जागांसाठी आज मतदान, तेजस्वी-सम्राट यांच्यात थेट सामना, तर भाऊ तेज प्रतापची स्वतंत्र लढत

RBI नं विकलं 35 टन सोनं? 60 हजार कोटींचं काय केलं?

Pune : पुणे जिल्ह्यात नरभक्षक झाले बिबटे, नागरिकांमधील दहशत कधी संपणार?

SCROLL FOR NEXT