varsha Bunglow Mumbai  saam tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde : वर्षा बंगल्याला अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. परंतु, वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहायला जाणार का ?

रामनाथ दवणे

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने खळबळ माजवून महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर (Maharashtra Government) शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. परंतु, वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहायला जाणार का ? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात होता. मात्र, शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून जवळपास एक महिन्याच्या कालावधीनंतर (Varsha Bungalow) वर्षा निवासस्थानाला एकनाथ संभाजी शिंदे अशा नावाची पाटी लावली गेलीय. गेलीय तसेच वर्षा बंगल्याची रंगरंगोटी देखील पूर्ण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २०१४ पासून मलबार येथील नंदनवन या शासकीय निवासस्थानातून राज्याचा कारभार चालवत आले आहेत. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे वर्षा या निवासस्थानी राहायला जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता.

बर्षा बंगल्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. परंतु, नवनिर्वाचीत राज्य सरकार स्थापन झाल्यापासून महिना झाला, तरीही वर्षा बंगल्यावर नवनिर्वाचीत मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी लावली नव्हती. पण आता अखेर एक महिन्यानंतर वर्षा निवासस्थानाला एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी लावली गेलीय. त्यामुळे शिंदे आता वर्षा बंगल्यावर कधी राहायला जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे यांच्यानंतर आज एकनाथ संभाजी शिंदे यांच्या नावाची पाटी वर्षा बंगाल्याबाहेर लागली. एकीकडे राज्यात सरकार कुणाचे ? यावरुन वाद सुरु आहे तर दुसरीकड़े मात्र वर्षा बंगाल्याबाहेर नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी लावण्यात आली. या शासकीय निवासस्थानाची डागडुजी आणि रंगरंगोटीचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे थोड्याच दिवसात शिंदे हे वर्षावर आपला मुक्काम हलवतील,अशी चर्चा सुरू आहे.

Edited By - Naresh shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT