Cm Eknath Shinde On Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Cm Shinde On Thackeray: 'ते बिथरलेत', फडणवीस यांना चॅलेंज देणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं जोरदार प्रत्युत्तर

Cm Eknath Shinde On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं. आता फडणवीस यांना आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे यांना स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

'एक तर तू राहशील, नाहीतर मी', असं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं. यावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. यातच आता फडणवीस यांना आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे यांना स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, ''आम्ही जे काम केले, हे सगळं बघून ते बिथरले आहे. ते सगळे गोंधळले, आहे म्हणून अशी भाषा करत आहेत. राजकारणात कोणी कोणाला संपवण्याची भाषा करू नये. मीच काय महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभा आहे. असं आव्हान करण्यापूर्वी आपण कोणाविषयी बोलत आहे हे, बघितलं पाहिजे.''

शिंदे म्हणाले, ''आव्हान देण्यासाठी मैदान यावं लागतं, घरात बसून आव्हान देता येत नाही. कोणालाही संपवण्यासाठी पायात टाकत असायला पाहिजे. मनगटात ताकद असायला पाहिजे.''

उद्धव ठाकरे यांना भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही उत्तर दिलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''उद्धवजी सध्या तुम्ही खूप त्रागा करतायत. माणसाने तेच बोलावं, पण नीट बोलावं. माझी आणि उद्धव ठाकरे यांची 40 ते 45 वर्ष ओळख आहे, ते एवढे वर्ष कधी त्रागा करत नव्हते.''

चंद्रकांत पाटील म्हणाले, ''अलीकडच्या भाषणांमध्ये आगपाखड, तेच मुद्दे लोकांनी किती वेळा ऐकावे. तुम्ही अन्याय करत होतात. म्हणून एकनाथ शिंदे यांनी त्यांनी त्यांची वाट शोधली. तुम्ही त्यांचा हिंदुत्वाचा आत्मा दाबत होतात. तुम्ही किती वेळा एकनाथ शिंदेंनी अन्याय केला, अन्याय केला, असं म्हणत राहणार? बाकीचे विषय सुद्धा आहेत. मित्र म्हणून मला, असा प्रश्न आहे की, त्यांची आगपाकड का होत आहे?''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

SCROLL FOR NEXT