CM Eknath Shinde on Maharashtra Assembly Election Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणूक जिंकणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर निर्धार

CM Eknath Shinde on Maharashtra Assembly Election: ''आम्ही अजून मेहनत करू, आम्ही अजून कष्ट करू आणि महाराष्ट्रात जिंकून दाखवू'', असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यक्त केला.

साम टिव्ही ब्युरो

गिरीश कांबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

''आज युवकांसाठी योजनेची सुरुवात होतेय. त्यामुळे उद्योगांना ट्रेन अर्थात कुशल रोजगार मिळणार आहे. राज्यात अतिशय आनंदाचे वातावरण आहे. विरोधकांचे चेहरे पडले आहे. सरकार जे करते तेच बोलते, जे होते, तेच बोलते. मोदीजी आपल्याला आम्ही शब्द देतो की, आम्ही अजून मेहनत करू, आम्ही अजून कष्ट करू आणि महाराष्ट्रात जिंकून दाखवू'', असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं. याचवेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे, असं म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच मोदीजी मुंबईत येत आहेत. त्यांचे १३ कोटी जनतेतर्फे स्वागत करतो. पंतप्रधान हॅटट्रिक करणारे सर्वात यशस्वी व लोकप्रिय नेते ठरलेले आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वात भारताने अभूतपूर्व प्रगती केली. त्यांच्या नेतृत्वाखाली देश दुप्पट गतीने वाटचाल करेल, अशा शुभेच्छा देतो.''

शिंदे म्हणाले, ''लोकसभा निवडणुकीत पूर्ण देशात प्रधानमंत्रीपदासाठी एकच नाव होते, ते नरेंद्र मोदींचे. विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह पसरवत, जे जे शक्य होते, ते केले. संविधान बदलणार, असे बोलले. पण असत्याचे आयुष्य कमी असते.''

मुख्यमंत्री म्हणाले, ''विरोधकांनी पराभूत होण्याची हॅट्रीक केली आणि पेढे वाटले. १०० जागा तुम्ही जिंकू शकला नाहीत, आणि पेढे वाटताय. मोदीजी आपल्या कामात प्रभू राम आहेत. आपल्यासोबत बाबासाहेबांचे संविधान आहे. एनर्जी, कमिटमेंट यांचा एकच अर्थ आहे, मोदीजी.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: एकटं राहूनही खुश असतात हे लोक, चाणक्यांनी सांगितली ५ कारणं

Maharashtra News Live Update: लातूरच्या RCC क्लासवर शिवसेनेकडून शाही आणि काळ ऑइल फेकलं

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

Pune crime news: पुण्यात रक्तरंजित थरार! बायकोशी अफेअर असल्याचा संशय; नवऱ्याने तरुणाला क्रूरपणे संपवलं

SCROLL FOR NEXT