Eknath shinde, devendra fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर, अमित शाहांची घेणार भेट

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या आठवड्यात मुंबई दौऱ्यावर येऊन गेले. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आज दौऱ्यावर आहेत.शिंदे-फडणवीस यांची केंद्रीय गृहमत्री आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत बैठक होणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार धनंजय महाडिक उपस्थित असणार आहेत. दुपारी ४ वाजता बैठक होणार आहे.

बैठकीमध्ये राज्यातील नवीन सहकारी कायदा, मल्टी स्टेट बँक आणि कारखान्यासंदर्भातील नवीन कायदा, साखर उद्याग, कापूस प्रक्रिया उद्योग, फळ प्रक्रिया उद्योग, इथेनॉल धोरण, मासेमारी, आजारी कारखाने आदी मुद्यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता.

सोबतच राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाहांसोबतची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याशिवाय राज्यातील विकास कामांसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांनी यावेळी अनेक विकास कामांच लोकार्पण आणि उद्घाटन केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Pooja Khedkar: बेशुद्ध केलं, हात-पाय बांधले नंतर...; पूजा खेडकर यांच्या घरी जबरी चोरी

Mugdha-Prathamesh : मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या घरी आला नवा पाहुणा, VIDEO शेअर करून दिली गुडन्यूज

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात मकरसंक्रांतीला ₹३००० जमा होणार का? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यातच विषय संपवला

Jio Netflix offer: आता Netflix चा आनंद फुकटात मिळणार, Jioची धमाकेदार ऑफर, वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT