cm eknath shinde appeals to manoj jarange patil on maratha reservation Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत हालचालींना वेग; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक, मनोज जरांगेंनाही निमंत्रण

CM Eknath Shinde-Manoj Jarange : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: आज मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज सायंकाळी ४ वाजता महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकारला दिलेला मुदत संपल्यानंतर आता मनोज जरांगे मुंबई उपोषण करणार आहेत. त्यासाठी योत्या २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून मराठा बांधव पायी निघणार आहेत. त्याआधी मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: आज मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज सायंकाळी ४ वाजता महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीपूर्वी हा संवाद साधला जाणार आहे. आजच्या बैठकीला मनोज जरांगे पाटील यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मंत्री शंभुराज देसाई यांनी मनोज जरांगे यांना बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पत्र लिहून विनंती केली होती. मराठा आरक्षण विषयासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया, कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरु असलेली कार्यवाही व एकूण मराठा आरक्षणाविषयी सर्व विषय याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक आज मुंबईत आयोजित करण्यात आली आहे.

पत्रात काय म्हटलं?

मराठा आरक्षणासंदर्भात आपल्या असणाऱ्या आग्रही भूमिकेच्या अनुषगांने या बैठकीस आपण उपस्थित राहून आपली भूमिका सांगावी. तसेच न्यायालयीन प्रक्रियेत मराठा आरक्षणाच्या बाजूने मांडावयाची आपली मते या बैठकीत सहभागी होऊन आपण मांडावीत. याकरिता सदर बैठकीस आपण उपस्थित राहावे, अशी विनंती मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य शंभुराज देसाई यांनी मनोज जरांगे यांना पत्राद्वारे केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ज्याला पाडायचे त्याला पाडा - मनोज जरांगे

Sunday: रविवारी करा 'या' वस्तूची खरेदी

Aishwarya-Avinash Narkar: दाक्षिणात्य गाण्यावर थिरकले नारकर कपल; लेक अन् जावयाचा भन्नाट डान्स पाहून वडिलांच्या चेहऱ्यावर आले हसू, पाहा VIDEO

Bengaluru School: खेळताना अंगावर पानी पडले, संतापलेल्या मॅडमने काठीने मारलं, पोराचे दात तुटले; गुन्हा दाखल!

Manoj Jarange : संभ्रम नकोच! ज्याला पाडायचं त्याला पाडा अन्..., मनोज जरांगेंचा एल्गार, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT