Maratha Reservation: 'मराठ्यांना आरक्षण दिलं तर अयोध्येला नक्की जाऊ...', राम मंदिराविषयी काय म्हणाले मनोज जरांगें? जाणून घ्या

Maratha Reservation News: मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला नक्की जाऊ.आम्ही रस्त्यानं चालताना 22 तारखेला राम मंदिराचा आनंद साजरा करू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे ते अंतरवाली सरातीत पत्रकारांशी बोलत होते.
Maratha Reservation
Maratha ReservationSaam Digital
Published On

Maratha Reservation

मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला नक्की जाऊ.आम्ही रस्त्यानं चालताना 22 तारखेला राम मंदिराचा आनंद साजरा करू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे ते अंतरवाली सरातीत पत्रकारांशी बोलत होते. 20 तारखेपर्यत राज्य सरकारला चर्चेची दारं खुले असून अंतरवालीतून आम्ही पाय बाहेर टाकला की सरकारसाठी चर्चेची दारं बंद होतील नंतर चर्चा नाही असा अशाराही त्यांनी दिला आहे.

शंभुराजे देसाई यांनी मला पत्र पाठवून उद्या मुंबईत होणाऱ्या आरक्षणांबाबतच्या बैठकांना बोलावलं आहे. मात्र मी या बैठकांना जाणार नाही. उद्या 4 ते 5 मॅरेथॉन बैठका मुंबईत होणार असून ओबीसीतून मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीकडे केली आहे. सरकारनंच उद्याच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घ्यावा आणि काय निर्णय घेतला याबाबत कळवावं. आम्हाला आडवलं नाही तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबई आणि मतदारसंघातील दारात जाऊन बसणार आहे. मराठा कुणबीच असल्याचे ट्रकभर पुरावे सापडले आहेत, मग आरक्षण देण्यात अडचण काय आहे? मराठ्यांनी तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Reservation
Rohit Pawar News: आमदार रोहित पवार लोकसभेच्या रिंगणात; प्रफुल्ल पटेलांना आव्हान देणार? जिल्हाध्यक्षांचा मोठा दावा

आंदोलनात हसू होईल असं कृत्य एकाही मराठ्याने आंदोलनात करू नये. फक्त शांत होऊन आंदोलनात बसा असंही ते म्हणाले. 13 तारखेला ओबीसींची बीडमध्ये सभा होणार आहे यावर बोलताना ते म्हणाले, ते तुमचा राजकारणासाठी वापर करून घेतायेत. आमच्या नोंदी ओबीसींमध्ये सापडल्या आहे. आम्हाला तिथेच आरक्षण हवं आहे. त्यांचं ऐकून फुकटचं भांडण विकत घेऊ नका, ते इकडे सभेत लोक दाखवतात आणि त्याच्यावरील केसेस मागे घेतात, अशी टीकाही जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर केली आहे.

Maratha Reservation
Truck Drivers Strike: ट्रकचालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण, नवी मुंबईत पोलिसांना मारहाण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com