अभिजीत देशमुख
Cm Eknath Shinde News: दिवा शहराच्या विकासासाठी ठाण्याच्या धर्तीवर दिव्यात देखील क्लस्टर योजना राबवणार, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवा येथील सभेत केली.
कल्याण शीळ रोडवरील खिडकाळी मंदिर परिसर सुशोभिकरनासह दिवा बेतवडे येथे आगरी कोळी वारकरी भवनाचे भूमिपूजन आणि दिव्यातील रस्ते जलवाहिन्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी, ठाणे पालिका आयुक्त उपस्थित होते. (Latest Marathi News)
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण शीळ रोडवरील खिडकाळी मंदिर परिसर सुशोभिकरनासह दिवा बेतवडे येथे आगरी कोळी वारकरी भवनाचे भूमिपूजन आणि दिव्यातील रस्ते जलवाहिन्याचे लोकार्पण करण्यात आले.
कल्याण डोंबिवलीमधील ग्रामस्थ आगरी कोळी बांधव व वारकरी संप्रदायाकडून गेल्या अनेक महिन्यांपासून कल्याण लोकसभा क्षेत्रात आगरी कोळी वारकरी भवन उभारण्याची मागणी केली जात होती.
वारकरी भवनाचे भूमिपूजन झाल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भूमिपूजन प्रसंगी सुमारे दोन हजार वारकरी हातात टाळ मृदुंगाच्या गजरात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. वारकरी भवन भूमिपूजन प्रसंगी बेतवडे येथील सभेत बोलताना शिंदे यांनी दिवा येथील आगरी कोळी वारकरी भवनासाठी १५ कोटी दिल्याचे सांगितले.
'सगळा आराखडा एकत्र करा आणखी १५ कोटी एकूण ३० कोटी देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच डोंबिवलीत होणाऱ्या संत सावळाराम महाराज स्मारकसाठी जागा पण मिळेल आणि पैसे पण मिळतील असे आश्वासन देखील दिले.
यंदाच्या वर्षी सर्वाधिक परदेशी गुंतवणूक आणणारे राज्य हा मान महाराष्ट्राला मिळाल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर दिव्यामध्ये फुलांची उधळण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत श्रीकांत शिंदे यांनी दिव्यासाठी पोलीस चौकी,क्लस्टर योजना राबविण्याची मागणी केली.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना-भाजप सरकार असल्यानंतर जे निर्णय घेतले सर्वसामान्यांच्या हिताचे घेतले. आपल्या सरकारने सिंचनाचे १८ हजार कोटी रुपयांचे २९ प्रकल्प मंजूर केले. दिव्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे आवश्यक आहे. त्यासाठी निधी आणि जागा शोधण्याचे आयुक्तांना सांगितले .
दिव्याच्या विकासाकरिता रेल्वे मंत्र्यांसह पंतप्रधानांना साकडे घालणार असल्याचे सांगितले. राज्याची नमो आवास योजना सुरू करत राज्यभरात १० लाख घरे बांधतोय. ठाण्याप्रमाणे दिवा येथे क्लस्टर योजना राबवण्याचा निर्णय घेतोय. आयुक्तांना सूचना केल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुढे बोलताना शिंदे यांनी एक बार मैने कमिटमेंट कर दी, तो मै किसी की नही सुनता, असा फिल्मी डायलॉग मारला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.