Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाचं काम मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

Navi Mumbai Airport : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टरमधून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामांची पाहणी केली.
Navi Mumbai Airport
Navi Mumbai Airport Saam TV
Published On

Mumbai News : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार करण्यासाठी नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी केली जात आहे. वेगाने या विमानतळाचं काम सुरु आहे.

काल म्हणजे ७ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टरमधून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामांची पाहणी केली. कामाचा वेग पाहता मे २०२४ पर्यंत विमानतळाचे काम पूर्ण होऊन पहिले उड्डाण होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Navi Mumbai Airport
Political News: नुसती ट्विटरवरून टीका करून कामं होत नाहीत; खासदार श्रीकांत शिंदेंची मनसे आमदार राजू पाटलांवर टीका

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आधी हवाई पाहणी केली तर नंतर प्रत्यक्ष नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील टर्मिनल इमारत आणि धावपट्टीची पाहणी केली. नवी मुंबई विमानतळ हे पुणे, मुंबई शहरांसह गोवा राज्यासाठीही महत्त्वाचे आहे. (Latest marathi News)

या विमानतळमुळे मुंबईवरील भार कमी होणार आहे. डिसेंबर 2024 ची डेडलाईन असली तरी मे 2024 पर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे भूमिपूजन झालं होतं. विमानतळाचं उद्‍घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होईल, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

Navi Mumbai Airport
Supriya Sule On Mira Road Case: 'लिव्ह-इन'मधील प्रेयसीची हत्या केली, तुकडे करून कुकरमध्ये शिजवले; मीरा रोड प्रकरणावरून सुप्रिया सुळे संतापल्या

कसं असेल विमानतळ?

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात चार टर्मिनल असतील. याठिकाणी एकावेळी ४२ विमाने उभी राहू शकतील. ५५०० क्षमतेचे कार पार्किंगही या ठिकाणी असेल. विमानतळाचा विस्तार ११.४ किलोमीटर पर्यंत असेल. विमानतळावर दोन धावपट्ट्या उपलब्ध असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com