cm eknath shinde appeals to manoj jarange patil on maratha reservation Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक, मनोज जरांगे यांनी आंदोलन थांबवावं; CM एकनाथ शिंदेंचे आवाहन

CM Eknath Shinde On Maratha Andoalan : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ज्या ज्या सूचना केल्या त्यानुसार कुणबी दाखले देण्याचं काम वेगाने सुरु आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेसह भगवं वादळ मुंबईच्या दिशेने निघालं आहे. लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी आंदोलन थांबवावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ज्या ज्या सूचना केल्या त्यानुसार कुणबी दाखले देण्याचं काम वेगाने सुरु आहे. हजारो-लाखो लोकांना कुणबी नोंदी मिळत नव्हत्या, त्या शोधून त्यांना कुणबी दाखले दिले जात आहेत.  (Latest Marathi News)

तेलंगणा, हैदराबाद येथे जुनी दस्तावेज आहेत, ती तपासली जात आहे. अनेक दस्तावेज उर्दू, फारसी, मोडी लिपीत आहेत, ती देखील तपासली जात आहेत. तेथे अनेक तज्ज्ञांचा नेमणूक केली आहे. ते देखील काम वेगाने सुरु आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

एकीकडे कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरु आहे. तर दुसरीकडे मागासवर्ग आयोग आपलं काम करत आहे. मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी देखील लाखो लोक तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत. मराठा समाजाचा इम्पिरिकल डेटा गोळा केला जात आहे. अशीरितीने मराठा समाजाला टीकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

येत्या फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला आहे. मराठा समाजाच्या आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या किंवा इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी सरकार कटीबद्ध आहे.

सरकार सकारात्मक आहे, तर आंदोलकांनीही सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. मनोज जरांगेंच्या अनेक सूचना मान्य केल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं हे आंदोलन थांबलं पाहिजे. कारण या आंदोलनामुळे जनतेला त्रास होणार आहे. मागे आरक्षण रद्द झालं, त्यावर काम करुन त्रुटी दूर केल्या जात आहे. त्यामुळे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निकाल पुढे ढकलला, EVM मध्ये मतं सुरक्षित राहतील का? संगणक शास्त्रज्ञांनी थेट डेमो दाखवला

Maharashtra Nagar Parishad Live : आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Winter Fashion: हिवाळ्यात स्टायलिश लूकसाठी या टिप्स नक्की फॉलो करा, मिळेल ट्रेंडी आणि ग्लॅमरस लूक

Maharashtra Live News Update: निलेश राणे मालवण पोलीस ठाण्यात दाखल

Olya Naralache Vade: जेवणाला पुऱ्याच कशाला? बनवा पांरपांरिक पद्धतीने कुरकुरीत ओल्या नारळाचे वडे

SCROLL FOR NEXT