Senior Citizen Schemes in Maharashtr Saam TV
मुंबई/पुणे

Senior Citizens Schemes : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत मोठी घोषणा; ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लाभ, VIDEO

Senior Citizen Schemes in Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. याचा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार आहे.

Satish Daud

सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एक मोठी घोषणा केली आहे. याचा लाभ राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. नेमकी मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली? याबाबत जाणून घेऊयात

मुख्यमंत्री शिंदे यांची विधानसभेत मोठी घोषणा

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घेता यावे यासाठी मुख्यमंत्री तीर्थयोजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

यासंदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्ष्यवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा केली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे".

"त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करून त्याची नियमावली केली जाईल. त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीने, ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबविण्यात येईल", असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT