विद्यार्थ्यांच्या 'फी' चे १४ लाख लाटणाऱ्या लिपीक महिलेला अटक! SaamTVNews
मुंबई/पुणे

विद्यार्थ्यांच्या 'फी' चे १४ लाख लाटणाऱ्या लिपीक महिलेला अटक!

बोरिवली पूर्वच्या सिद्धार्थ नगरच्या सेंट जाॅर्ज हायस्कूल येथील खासगी शाळेत स्वाती कदम ही लिपीक म्हणून कामाला होती.

सूरज सावंत

मुंबई : खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या 'फी'चे १४ लाख रुपये लाटणाऱ्या महिला लिपीकाला कस्तुरबा पोलिसांनी अटक केली आहे. स्वाती कदम (४०) असे या आरोपीचे नाव असून न्यायालयाने (Court) तिला पोलिस कोठडी सुनावली आहे. शाळेच्या विश्वस्तांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आल होता.

हे देखील पहा :

बोरिवली पूर्वच्या सिद्धार्थ नगरच्या सेंट जाॅर्ज हायस्कूल येथील खासगी शाळेत (School) स्वाती कदम ही लिपीक म्हणून कामाला होती. कोविड-19 मुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन (Online) वर्ग सुरू होते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून २०१९-२० आणि २०-२१ या शैक्षणिक वर्षाची फी घेतली जात होती. हे पैसे कदम बनावट चेकद्वारे चोरायची. दोन वर्षात कदम हिने तब्बल १४ लाखांवर डल्ला मारला.

शाळेच्या ऑडिट (Audit) दरम्यान हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर शाळा प्रशासनाच्या विश्वस्तांनी कस्तुरबा पोलिस ठाण्यात कदम यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. या प्रकरणी कस्तुरबा पोलिसांनी गुन्हा दाखल करून स्वाती कदम हिला अटक केली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

रामलीला मैदानावर रावणासोबत झुरळही जाळणार; स्वच्छ भारत अभियानाचा दावा की राजकीय निशाणा?

CJPच्या आंदोलनाआधीच दिपके पोलिसांच्या ताब्यात; दिल्लीत पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा

तिकीट तपासणीवरून महिला प्रवासीचा टीसीसोबत वाद; कांदिवली स्टेशनवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT