Class 10 Girl in Navi Mumbai ends life Saam
मुंबई/पुणे

बेंचखाली कॉपी सापडली, मुख्याध्यापिकांकडून अपमान, दहावीच्या विद्यार्थिनीनं आयुष्याचा दोर कापला

Class 10 Girl in Navi Mumbai ends life: ऐरोलीतील दहावीच्या विद्यार्थिनीनं आयुष्याचा दोर कापला. कॉपीचा आरोप झाल्यानं आयुष्य संपवलं. मुख्याध्यापिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Bhagyashree Kamble

  • दहावीच्या विद्यार्थिनीनं आयुष्य संपवलं.

  • कॉपीचा आरोप.

  • मुख्याध्यापिकांवर गुन्हा दाखल.

नवी मुंबईतील ऐरोलीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दहावीत शिकणाऱ्या मुलीनं आत्महत्या केली आहे. तरूणीवर परिक्षेत कॉपी करण्याचा आरोप करण्यात आला होता. तिला सर्वांसमोर अपमानित केलं. अपमान सहन न झाल्यामुळे तिनं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

अनुष्का केवळे असं दहावीत शिकणाऱ्या मृत तरूणीचे नाव आहे. तरूणी एरोलीतील रहिवासी होती. सुशिलाबाई देशमुख विद्यालयात दहावीची परिक्षा सुरू आहे. घटनेच्या दिवशी अनुष्का दहावीची परिक्षा द्यायला गेली होती. परीक्षेचा पेपर सुरू असताना अनुष्का केवळे हिच्या बॅन्च खाली कॅापी मिळाली.

पेपर सोडवण्यासाठी कॉपी केली जात असल्याचा आरोप करत मुख्याध्यापिका आणि शिक्षकाने तिला झापलं. तरूणीला सर्वांसमोर आरडाओरड केली. अपशब्दांचा वापर करून तिला अपमानित केलं. यामुळे अनुष्का खचली होती. तिनं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

तिनं घटनेच्या दिवशी आत्महत्या करून आयुष्य संपवलं. या प्रकरणाची माहिती कुटुंबाला कळताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून रबाळे पोलीस ठाण्यात सुशिलाबाई देशमुख विद्यालयाच्या मुख्याध्यापिका देशमुख मॅडम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भर मैदानात जोरदार राडा, दोन भारतीय खेळाडू एकमेकांशी भिडले; नेमकं काय घडलं? VIDEO

Nandurbar News: वाहनात पेट्रोल भरत असताना माथेफिरूने पेट्रोल पंपावर आग लावण्याचा धक्कादायक प्रयत्न|VIDEO

Prakash Ambedkar : 'मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण...; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update: भंडारा शहरातील मिस्कीन टॅंक गार्डनचा तलाव फुटला

Bacchu Kadu : मैत्रीत दुरावा! गुलाबराव पाटलांची भेट न घेताच बच्चू कडू परतले, कारण काय?

SCROLL FOR NEXT