Mumkbai News
Mumkbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: ठाकरे-शिंदे गटात राडा; शिवसेनेचे सार्वजनिक वाचनालय आणि ज्येष्ठ नागरिक कट्टा ताब्यात घेण्यावरून वाद

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

मुंबई : शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय देऊन काही उलटून गेले आहेत. या निर्णयानंतर शिंदे समर्थकांनी ठाणे जिल्ह्यातील अनेक शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर आता प्रथमच मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडे आंबोली परिसरातील शिवसेना शाखेसमोरील सार्वजनिक वाचनालय व जेष्ठ नागरिक कट्टा देखील ताब्यात घेण्याचा शिंदे समर्थकांकडून प्रयत्न करण्यात आला आहे.

आंबोली शिवसेना शाखेसमोर असलेल्या वाचनालयाच्या फलकावर शिंदे समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावून वाचनालय व ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे अंधेरीत शिवसेना आणि ठाकरे गटात जोरदार राडा झाला. शिंदे समर्थकांनी उद्धव ठाकरे गटाच्या शाखेत घुसून जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला आहे. त्यामुळे अंधेरी आंबोलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latest News)

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे घटना दिल्यानंतर अंधेरी पश्चिमेकडे ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. खासदार गजानन कीर्तिकर यांनी देखील शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सार्वजनिक वाचनालयाच्या फलकावरील गजानन कीर्तिकर यांच्या फोटोला काळे फासले होते.

मात्र आता अंधेरी पश्चिमेकडील आंबोली परिसरात माजी नगरसेवक असलेल्या पांडुरंग आंब्रे यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आज कैलासवासी शांताराम आंब्रे यांच्या स्मरणात उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्टा व सार्वजनिक वाचनालय या ठिकाणी शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व स्वर्गीय आनंद दिघे यांचा फोटो लावून सार्वजनिक वाचनालय व ज्येष्ठ नागरिक कट्टा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना समजतात मोठ्या संख्येने या ठिकाणी ठाकरे समर्थक उपस्थित झाले.

दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्यामुळे या ठिकाणी काही काळ घोषणाबाजीमुळे वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली. वेळीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला. यानंतर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून या ठिकाणावरून पांगवण्यात आले आता ठाकरे गटाचे शिवसेनेक या विरोधात डीएन नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देणार आहेत.

आंबोली विधानसभा अस्तित्वात असताना या विधानसभेचे आमदार म्हणून स्वर्गीय शांताराम आंब्रे हे निवडून आले होते मात्र त्यांच्या निधनानंतर शांताराम आंब्रे यांच्या स्मरणार्थ सार्वजनिक उत्सव समिती आंबोली आणि शिवसेना आंबोली शाखेकडून ज्येष्ठ नागरिक कट्टा व सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती करण्यात आली होती मात्र आता याच कट्ट्यावर शिंदे समर्थकांनी धावा केल्यामुळे येथे कैसे तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पाहायला मिळालं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur News: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल करणारा व्हिडिओ केला व्हायरल, अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल

Today's Marathi News Live : संभाजीनगर शहरात गॅस सिलिंडरचा स्फोटानंतर लागली आग

Special Report : कोकणात रंगणार ठाकरे विरूद्ध ठाकरे लढाई, सभांचा झंझावात

Sanjay Nirupam : त्यावेळी माझ्यासोबत दगाफटका...; शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करताच संजय निरुपम यांनी सांगितला तो किस्सा

Special Report : Ajit Pawar यांना पुतण्या Yugendra Pawar देणार आव्हान?

SCROLL FOR NEXT