Clash in Lalbaug Raja Ganpati Mandap shocking video viral Saam TV
मुंबई/पुणे

Lalbaugcha Raja 2023: लालबाग राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी; धक्कादायक घटनेचा VIDEO व्हायरल

Lalbaugcha Raja Video: मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजा मंडपात मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे.

Satish Daud

आवेश तांदळे, साम टीव्ही

Lalbaugcha Raja Clash Video

राज्यात गणेशोत्सवाचा सण अगदी आनंदात साजरा केला जात असताना मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजा मंडपात फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये ही हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओ पाहून अनेकजण संताप व्यक्त करीत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वसाला पावणारा गणपती म्हणून मुंबईतील लालबागच्या राजाची ओळख आहे. यामुळेच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक मुंबईत येत असतात. राज्याच्या दर्शनासाठी लाखो लोक रांगा लावतात. (Latest Marathi News)

यंदाही लालबागच्या राजाला (Lalbaugcha Raja) पाहायला भाविक गर्दी करत आहेत, मात्र दरवर्षी प्रमाणे मंडळाचे व्यवस्थापन कुचकामी ठरताना दिसत आहे. सध्या लालबागच्या राजाच्या दरबारातील एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण केली जात असल्याचं दिसून येत आहे. यादरम्यान, मंडपात मोठा गोंधळ देखील निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय.

दरम्यान, अगदी दोन दिवसांपूर्वी लालबाग राजाच्या मंडपातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओत दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भक्तांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याचं दिसून येत होतं. यामध्ये महिला आणि लहान मुले देखील गर्दीत चिरडताना दिसून आले. विशेष म्हणजे, यावेळी मुंबई पोलीस कुठेही दिसत नव्हते.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT