pune , market yard, crime news saam tv
मुंबई/पुणे

VIDEO : पुण्यात दोन गटात हाणामारी, भरवस्तीत झालेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत

पुण्यातील बुधवार पेठेत दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन जाधव

पुणे : पुण्यातील (Pune) गेल्या काही दिवसांना गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. गटागटांचे वाद, हाणामारीच्या घटनाही बऱ्याच वाढल्या आहेत. पुण्यातील बुधवार पेठेत असाचा राडा रविवारी पाहायला मिळाला. त्याचं सीसीटीव्ही फूटेज आता समोर आलं आहे.

पुण्यातील बुधवार पेठेत दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.रविवारी रात्रीच्या सुमारास बुधवार पेठेतील क्रांती चौकात हा सगळा प्रकार घडला आहे. ही सर्व थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Latest Marathi News)

व्हिडीओमधील दृष्यांनुसार दोन गट आमने-सामने आले आहेत. एका व्यक्तीच्या हातात कोयता दिसत असून तो समोरील काही जणांवर सपासप वार करताना दिसत आहे. मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. घटना घडली त्यावेळी रस्त्यावर स्थानिकांची गर्दी होती. अचानक घडलेल्या प्रकारामुळे एकच पळापळ झाली. यामुळे परिसरातही दहशतीचं वातावरण आहे.

पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घटना घडल्याने पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच अजूनही पोलिसात या घटनेची नोंद देखील झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aliv Laddoo: केसं खूप गळतायंत? तेल,शॅम्पू बदलून काही फरक नाही? मग १५ दिवस खा 'हा' खास लाडू, दिसेल मॅजिकल फरक

Penguin Life: पेंग्विन काय खातात आणि किती वर्षे जगतात? ही माहिती ९९ टक्के लोकांना माहितच नसेल

Maharashtra Live News Update: भीमाशंकर मंदिरात खासदार निशिकांत दुबे यांचे दर्शन; तहसिलदार यांना चौकशीच्या सुचना

Yavatmal : हातपाय बांधून कारमध्ये कोंबलं, मुलं पळवणारी टोळी समजून गावकऱ्यांनी तरुणांना तुडवलं; दोघे गंभीर जखमी

फार्महाऊसवर सुरू होती ड्रग पार्टी; माजी आमदार निघाला कोकिन टेस्ट पॉझिटिव्ह, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT