Beed : पंकजाताईंनी दिलेला चेक बाउन्स होऊ देणार नाही; धनंजय मुंडे यांचे मिश्किल उत्तर

पंकजा मुंडे - धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर
Beed News
Beed NewsSaam Tv

Beed News : पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यातला राजकीय संघर्ष अवघ्या राज्याला माहित आहे. पण, परळीमध्ये एका कार्यक्रमात हे दोघेही भाऊ-बहिण काच व्यासपीठावर पाहायला मिळाले. यावेळी बहिणीने दिलेला चेक बाउन्स होऊ देणार नाही, असा मिश्किल टोला धनंजय मुंडेंनी लगावला.

बीडच्या (Beed) परळी येथील कार्यक्रमात पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde)एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. यादरम्यान दोघांमध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा पाहायला मिळाला. परळीची सुवर्ण कन्या श्रद्धा गायकवाड हिच्या नागरी सत्कार सोहळ्यात दोघांनाही संयोजकांनी बोलवले होते. यावेळी पंकजांनी भाषण करतांना श्रद्धा तुला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान कडून ब्लॅक चेक देते आहे, जेवढी रक्कम तिला हवी आहे तेवढी त्यांनी टाकावी. फक्त चेक बाउन्स झाला नाही पाहिजे एवढी रक्कम टाकावी असं म्हणत मदतीसाठी हात पुढे केले.

Beed News
Nashik News : त्र्यंबकेश्वर मंदिरात सशुल्क दर्शनाची सक्ती नाही; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

तर याला उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले, की पंकजाताईंनी आता श्रद्धाला चेक दिलाय. एवढं म्हणताच पंकजा मुंडेंनी त्यात पैसे टाका असं म्हणाल्या. त्यावर धनंजय मुंडे म्हणाले, की जरी त्या अकाउंट मधील पैसे कमी पडले, तर मी टाकेल. आजून ही टाकत आहे. बहिणीने दिलेला चेक बाऊन्स होऊ देणार नाही..काळजी करू नको.असं म्हणत धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवलं. त्यामुळे सभागृहात एकच हश्शा पिकली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com